Friday, 4 November 2016

बुलडाणा गैरप्रकाराची चौकशी महिला आय.पी.एस. अधिका-यामार्फत : मुख्यमंत्री फडणवीस

नवी दिल्ली 04 : बुलडाणा येथील आश्रमशाळेत झालेल्या गैरप्रकाराची  चौकशी महिला आयपीएस अधिका-यामार्फत केली जाईल अशी घोषणा मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली  येथे  केली.

       बुलडाणा येथे घडलेली घटना ही अत्यंत गंभीर असून राज्य शासनाने याची गंभीर दखल घेतली आहे.  याप्रकरणातील आरोपीं व संस्था चालकांना अटक करण्यात आलेली आहे. या घटनेची चौकशी महिला आयपीएस अधिका-यामार्फत करण्यात येणार असून राज्यातील सर्व शासकिय व अनुदानित आश्रमशाळांमध्ये महिला अधिकारी भेट देतील व प्रत्येक मुलीशी बोलून वस्तुस्थिती जाणून घेतील  असे आदेश देण्यात आलेले आहेत.

No comments:

Post a Comment