नवी दिल्ली, 30 : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (मनरेगा) च्या अंतर्गत झालेले कामे ‘जियो मनरेगा’ तंत्रज्ञानाच्या सहायाने कुठेही आणि केव्हाही पाहता येतील. या तंत्रज्ञानाच्या सहायाने राज्यातील औरंगाबाद, अमरावती, नाशिक या तीन जिल्ह्यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यासाठी आज या जिल्हयांना पुरस्कृत करण्यात आले.
येथील विज्ञान भवनात केंद्रीय ग्रामीण विकास मंत्रालयाच्यावतीने
‘जियो मनरेगा’ लोकार्पण सोहळयाच आयोजन करण्यात आले.
यावेळी केंद्रीय ग्रामीण विकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता मंत्री नरेंद्र
सिंग तोमर, अंतराळ विभाग (स्वतंत्र प्रभार) राज्य मंत्री जितेंद्र सिंग, ग्रामीण
विकास राज्य मंत्री रामक्रीपाल यादव, आदी मान्यवर व्यासपीठवर उपस्थित होते.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेव्दारे विविध बांधकाम केले जाते. यामध्ये शेततळे, चेक
डँम, रस्ते, पांनधन, विहिरी, असे अनेक
कामे केली जातात. जी कामे प्रत्यक्षात
झालेली आहेत, त्या कामांचे ‘भुवन’ या ऍपव्दारे छायाचित्रण करून टॅगींग केले जाईल.
यामुळे कामात मनरेगाच्या कामात अधिक पारदर्शकता येईल. एकदा टॅगींग झालेले
छायाचित्र पुन्हा टॅगींग करता येणार नाही. हे यामध्ये विशेष आहे.
मनरेगा अंतर्गत
झालेल्या कामांमधून, आज एकूण 6 लाख 35
हजार बांधकाम झालेल्या संपत्तीचे टॅगींग झाले. आज त्याचे लोकपर्ण केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री श्री तोमर
यांच्या हस्ते करण्यात आले.
औरगांबाद विभागीय
आयुक्त कार्यालयाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, अमरावती जिल्हयाचे
जिल्हा एमआयएस समन्वयक श्री अनंत घुगे आणि नाशिक जिल्हयाचे एमआयएस समन्वयक सनी
धात्रज यांना आज ‘जियो मनरेगा’ अंतर्गत
उत्कृष्ट काम केल्या बद्दल केंद्रीय ग्रामीण विकास राज्य मंत्री रामक्रीपाल यादव
यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.
No comments:
Post a Comment