नवी
दिल्ली 22 : केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री
श्री सुभाष भामरे यांच्या प्रयत्नांमुळे नाशिक जिल्हयातील शेतक-यांना जमीनी परत
मिळणार आहेत.
वर्ष 1964 मध्ये हिंदुस्थान एरोनॉटिक्स
लिमिटेडने रेल्वे सायडिंग बांधण्यासाठी नाशिक जिल्हयातील ओझर, कोकणगाव, दिक्षी, जिवाळे, थेरगाव, कसबे-सुकेणे
आणि पिंपळस(रामाचे) या गावांमधील जवळपास 196 एकर जमीन अधिग्रहीत केली होती. या
जमीनीवर अद्यापर्यंत काहीही बांधकाम झाले नसल्यामुळे त्यांच्या जमीनी परत मिळाव्या
अशी, स्थानीक शेतक-यांची मागणी होती. यासाठी सरंक्षण राज्यमंत्री श्री भामरे यांनी
पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले आहे.
हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिडेट ही कंपनी संरक्षण
मंत्रालयाच्या अखत्यारीत येते. शेतक-यांना त्यांच्या
जमीनी परत मिळण्याबाबत एचएएल
कार्यवाही करीत आहे.
No comments:
Post a Comment