Saturday, 3 December 2016

राज्यातील दिव्यांग खेळाडूंसाठी अकादमी उभारण्याचा मनोदय : राजकुमार बडोले


नवी दिल्ली, 03 : दिव्यांगासाठी राज्यात क्रीडा अकादमी सुरू करण्याचा मनोदय आहे. अशी माहिती सामजिक न्याय मंत्री श्री राजकुमार बडोले यांनी पत्रकार परिषदेत  दिली.

केंदीय सामजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालयाच्यावतीने आजअंतरराष्ट्रीय अपंग दिना च्या निमित्त विविध श्रेणीत पुरस्काराचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणा-या दिव्यांग व्यक्तींना विविध श्रेणीच्या पुरस्कारने आज सन्मानित करण्यात आले. महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळाला उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार राज्याचे सामजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांनी स्वीकारला. या कार्यक्रमानंतर महाराष्ट्र सदनात पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले, त्यावेळी ही माहिती श्री बडोले यांनी दिली.

आंतरराष्ट्रीय पॅराऑलिम्पीक स्पर्धेत भाग घेऊन देशासाठी पदक कमविणा-या खेळांडूना महाराष्ट्र राज्य अपंग वित्त व विकास महामंडळातर्फे 5 लाख रूपये रोख  पारितोषिक देण्याचा निर्णय राज्य शासनाने निर्णय घेतला आहे. दिव्यांग खेळाडूंना गुणवत्तापुर्ण प्रशिक्षण मिळावे, यासाठी अकादमी सुरू करण्याचा मनोदय आहे. यामुळे राज्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीयस्तरावर होणा-या विविध क्रीडा स्पर्धेत भाग घेऊन भविष्यात पदके मिळवू शकतील.

राज्यात 3 टक्के आरक्षण हे दिव्यांगसाठी आहे. राज्य शासनाने दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष रोजगार मोहिमे सुरू केली आहे. यातंर्गत नियोजनबद्धरीत्या  दिव्यांगाचा असलेला अनुशेष भरून काढण्यात येईल. अपंग वित्त व विकास महामंडळाचे भाग भांडवल 50 कोटी आहे. हे भाग भांडवल 300 कोटीपर्यंत  नेण्याचे उद्द‍िष्ट महामंडळाचे आहे. हे उद्दिष्ट भविष्यात पुर्ण करण्याचा निर्धार राज्य शासनाचा असल्याचे श्री बडोले यांनी सांगितले. 


No comments:

Post a Comment