नवी दिल्ली, 1 : कॅशलेस
पेमेंटमुळे दैनंदिन व्यवहारात सहजता, सुलभता आणि पारदर्शकता येते म्हणून
प्रत्येकाने या सुविधेचा उपयोग करावा असे आवाहन राज्याचे मुख्य सचिव स्वाधीन
क्षत्रिय यांनी आज येथे केले.
श्री.
क्षत्रिय यांच्या हस्ते आज कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनात ‘कॅशलेस पेमेंट’ पध्दतीचे उद्घाटन करण्यात आले, याप्रसंगी
ते बोलत होते. यावेळी सचिव तथा महाराष्ट्र सदनाच्या निवासी आयुक्त आभा
शुक्ला, राजशिष्टाचार व गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, श्री. क्षत्रिय यांच्या
पत्नी आणि दिल्ली स्थित बँक ऑफ महाराष्ट्रचे मुख्य व्यवस्थापक कमलकुमार ठाकुर यांच्यासह अधिकारी
व कर्मचारी उपस्थित होते.
कॅशलेस
पेमेंटच्या उदघाटनानंतर श्री.क्षत्रिय म्हणाले,महाराष्ट्र सदनामध्ये आजपासून सुरु
झालेल्या कॅशलेस पेमेंट व्यवहाराबद्दल आंनद आहे. कॅशलेस पेमेंटमुळे व्यवहारात
सहजता आणि पारदर्शकता येते, सदनात निवासास येणा-या अधिकारी व अन्य अभ्यागतांनी या सुविधेचा उपयोग करावा
असे आवाहन त्यांनी केले. महाराष्ट्र राज्य संपूर्णपणे कॅशलेस आणि डिजीटल
पेमेंटच्या दिशेने जाण्यासाठी ५ कलमी कार्यक्रम आखला आहे आणि अनेक प्रोत्साहनपर
योजना सुरु केल्या आहेत. परिणामी राज्यातील जनतेने मोठया प्रमाणात कॅशलेस पेमेंटचा वापर सुरु केला आहे असे श्री.
क्षत्रिय यांनी यावेळी सांगितले.
श्री. क्षत्रिय यांनी महाराष्ट्र
सदनातील त्यांच्या निवासाचे बील स्वत:
स्वॉईप मशीनचा वापर करून अदा केले. याबरोबर सदनात कॅशलेस पेमेंट
स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे. याआधी
सदनात पेटीएमद्वारे आणि रोखीने व्यवहार होत होते.
०००००
No comments:
Post a Comment