राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल
(एनडीआरएफ) च्या 12 वा स्थापना दिवसानिमित्त विज्ञान भवन येथे कार्यक्रमाचे आयोजन
करण्यात आले. या कार्यक्रमाची अध्यक्षता गृहराज्य मंत्री किरेण रीजीजू यांनी केली.
याप्रसंगी श्री रिजीजू यांच्या हस्ते हे
पुरस्कार प्रदान करण्यात आले.
जून 2013 मध्ये उत्तराखंड येथे नैसर्गीक आपत्ती झाली
होती. त्यावेळी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने अभुतपुर्वक कामगिरी करून येथे
अडकलेल्या भाविकांना सुखरूप बाहेर काढले होते. या कार्यादरम्यान राज्यातील जवान
शशीकांत रमेश पवार आणि गणेश अहीरराव हे शहीद झाले. वर्ष 2014 च्या प्रजासत्ताक
दिनाच्या पुर्व संध्येला या जवनांना उत्तम जीवन रक्षा पदक जाहीर झाले होते.
यासह वर्ष 2015 मध्ये हेड कॉस्टेबल अन्ना जलिंदर तांबे
यांना ऊत्कृष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदक जाहीर झाले होते, आज श्री तांबे
यांना हे पदक प्रदान करण्यात आले.
No comments:
Post a Comment