Wednesday, 8 February 2017

राज्यातील 6 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास होणार : सुरेश प्रभू





नवी दिल्ली, 8 : सार्वजनिक खाजगी भागीदारीच्या माध्यमातून देशभरातील एकूण 23 रेल्वे स्थानकांचा विकास होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. या कार्यक्रमाची घोषणा केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी रेल भवनमध्ये आज केली.
यामध्ये बॉम्बे सेंट्रल (बीसीटी), लोकमान्य टिळक टर्मिन्सल (एलटीटी), पुणे जनंक्शन, ठाणे, बांद्रा टर्मिन्लस, बोरीवली, या सहा रेल्वे स्थानकांचा समावेश आहे.
या रेल्वे स्थानकांच्या पूर्नविकासाकरिता खुल्या निविदा मागविल्या जातील. यामध्ये ए 1तथा श्रेणीच्या रेल्वे स्थानकांची निवड करण्यात आली आहे. प्रामुख्याने महानगरे, प्रमुख शहरे, स्मार्ट सिटी, अमृत या योजनेत सामील होणारी शहरे, तसेच पर्यटन आणि धार्मिक ठिकाणांवरील शहरांचा यात समावेश आहे.
या अतंर्गत रेल्वेकडून अधिकाधिक 140 एकर जमीन ही 45 वर्षाकरिता विकासकांना लीजवर देण्यात येईल. यासाठी रेल्वेने झोननुसार नोडल अधिका-यांची नेमणुक केली आहे. जे विकासकांसोबत चर्चा करतील. या रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास लीलावाव्दारे (बीडीव्दारे) निश्चित केला जाईल. या प्रथम टप्प्यातील रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासासाठी जवळपास 6000 ते 9000 कोटी रूपयें खर्च होऊ शकतात, असा अंदाज बोस्टन कन्सल्टंट ग्रुपने  व्यक्त केला आहे.
रेल्वे स्थानकांच्या पुर्नविकासामध्ये रेल्वे प्रवाश्यांना अधिकाधिक सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न जाईल. यामध्ये रेल्वे स्थानकांवर औषधी केंद्र, खरेदी केंद्र, खादयपदार्थांचे दालन, डिजीटल स्वाक्षरी, इलेक्ट्रीकल पाय-या, स्वंय तिकीट काउंटर, आरामदायक लाउंज, लगेज स्क्रीनींग मशीन, मोफत अथवा सशुल्क वाय-फाय सेवा, आदी सेवा उच्च दर्जाच्या उपलब्ध करून दिल्या जातील.
देशभरातील एकूण 407 रेल्वे स्थानकांचा पुर्नविकास होणार आहे. यामध्ये महाराष्ट्रातील एकूण 38 रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. यापैकी प्रथम टप्प्यात देशभरातील 23 रेल्वे स्थानकांची घोषणा आज करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील 6 रेल्वे स्थानके सामील आहेत. याशिवाय अकोला, अमरावती, बडनेरा, भुसावळ, चाळीसगाव, जळगाव, कुरवा, लातूर, मनमाड, मिरज, नाशिक रोड, पनवेल, साईनगर, शेगाव, अहमदनगर (मध्य रेल्वे), दौंड, कोल्हापूर, कोपरगाव, लोनावळा, बल्लारशा,  चंद्रपूर, वर्धा, नांदेड, औरंगाबाद, जालना, नगर (दक्षिण मध्य रेल्वे), परभणी, गोंदिया, सीएसटी मुंबई,  नागपूर, कल्याण, दादर, सोलापूर या रेल्वे स्थानकांचाही टप्प्या-टप्प्याने पुर्नविकास केला जाईल.


No comments:

Post a Comment