नवी
दिल्ली, १६ : केंद्रीय
अल्पसंख्यांक मंत्रालयाच्यावतीने आयोजित ‘हुनर हाट’ या प्रदर्शनात महाराष्ट्राची प्रसिध्द पुरणपोळी आणि पैठणी देश-विदेशी ग्राहक व पर्यटकांचे आकर्षण ठरले आहे.
येथील कॅनॉट प्लेस परिसरातील बाबाखडक
सिंह मार्गवरील स्टेट एम्पोरिया कॉम्पलेक्समध्ये केंद्रीय अल्पसंख्यांक
मंत्रालयाच्यावतीने ‘हुनर हाट’ हे अल्पसंख्यांक
समाजातील कारागीरांच्या ‘व्यंजन’ व ‘हस्त कलांचे’ विक्री तथा प्रदर्शन
आयोजित करण्यात आले आहे. या प्रदर्शनात देशातील विविध राज्य व केंद्र शासीत
प्रदेशांमधील कारागीरांनी सहभाग घेतला आहे. महाराष्ट्रातून मुंबई येथील दोन
व्यंजनांची आणि औरंगाबाद येथील एक पैठणीचा स्टॉल येथे लावण्यात आला आहे. या
स्टॉल्सवरील मराठी व्यंजन व पैठणीला प्रदर्शनीस भेट देणा-या देश – विदेशातील
ग्राहक व पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे.
प्रदर्शनीत मुंबईच्या अंधेरी भागातील
मृणालीनी कांबळे यांचा ‘मुंबई तडका’ हा स्टॉल
क्रमांक एफ-२३ आहे. या स्टॉलवरील पुरणपोळी येथे येणा-या खवय्येगिरांचे खास आकर्षण
ठरत आहे. या स्टॉलवरील खास महाराष्ट्रीय थाळी आणि वडा पाव, मिसळपाव, साबुदाना वडा
या व्यंजनांना खवय्येगिरांची खास पंसती
मिळत आहे. मुंबईच्याच महंमद फिरोज आलम यांचा स्टॉल क्रं. एफ-२२ येथे आहे. या स्टॉलवरील भेल पुरी, सेव पुरी आणि
वडा पावला चांगलीच मागणी आहे.
औरंगाबाद येथील फईम अहमद यांचा स्टॉल
क्रमांक सी-९५ हा ‘पैठणी’चा स्टॉलही
विशेष आकर्षण ठरला आहे. फईम अहमद यांच्या कलाकुसरीतून तयार झालेल्या मोर, आसावली
आणि लोटस डिझाईनच्या रूपये ९ हजारांपासून ६० हजार रूपये किमंतीच्या खास पैठणी याठिकाणी विक्रीस उपलब्ध आहेत. याच
स्टॉलवर बांबुपासून तयार करण्यात आलेली आकर्षक ग्रिटींग्जही विक्रीस ठेवण्यात आली
आहेत. पैठणीस चांगली मागणी असून दिल्लीला लागूनच हरियाणातील फरीदाबाद येथे
नुकत्याच संपन्न झालेल्या ‘सुरजकुंड आंतरराष्ट्रीय हस्तकला
मेळाव्यात रूपये एक लाख किमंतीला एक पैठणी विक्री करण्यात आल्याचे फईम अहमद
सांगतात.
प्रदर्शनात
हिंदी भाषेतील ‘लोकराज्य’ अंकाचे
कौतुक
या
प्रदर्शनीत ‘मुंबई तडका’ या स्टॉल क्रमांक
एफ-२३ वर हिंदी भाषेतील ‘लोकराज्य’ व
इंग्रजी भाषेतील ‘महाराष्ट्र अहेड’ ही
महाराष्ट्र शासनाची मुखपत्र मांडण्यात आली आहेत. या स्टॉलला भेट देणारे ग्राहक पर्यटक
ही मुखपत्रही वाचत आहेत. या मासिकांच्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाच्या विविध
योजना व कार्यक्रमांची होत असलेली प्रभावी अमंलबजावणी , मासिकांची आकर्षक मांडणी
आणि उत्तम आशयाचे कौतुक होत आहे.
केंद्रीय अल्पसंख्याक व्यवहार मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या
हस्ते ‘हुनहाट
प्रदर्शना’ चे ११ फेब्रुवारी २०१७ ला उदघाटन झाले. २४
राज्यांतील १०० कारागीर आणि ३० व्यंजनतज्ज्ञांनी या प्रदर्शनात सहभाग घेतला
असून १३० स्टॉल्स या ठिकाणी लावण्यात आली आहेत. २६ फेब्रुवारी पर्यंत हे
प्रदर्शन सकाळी १० ते रात्री ९ वाजेपर्यंत
सर्वांसाठी खुले राहणार आहे.
0000
No comments:
Post a Comment