Wednesday, 22 February 2017

आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमी पुरस्कार प्रदान


नवी दिल्ली, दि. 22 : ग्रामीण शैलीच्या लिखाणासाठी प्रसिद्ध असलेले लेखक व पत्रकार आसाराम लोमटे यांना त्यांच्या आलोक या लघुकथा संग्रहासाठी वर्ष 2016 चा साहित्य अकादमी पुरस्कार आज प्रदान करण्यात आला.
येथील कमानी सभागृहात साहित्य अकादमी 2016 च्या पुरस्कार सोहळयाचे आयोजन आज करण्यात आले. कार्यक्रमाचे मुख्यअतिथी भौतिक शास्त्रज्ञ तसेच मराठी लेखक जयंत विष्णु नारळीकर, साहित्य अकादमीचे अध्यक्ष विश्वनाथ प्रसाद तिवारी, साहित्य अकादमीचे उपाध्यक्ष चंद्रशेखर कंबार, सचिव के. श्रीनिवासराव तसेच साहित्य अकादमी पुरस्कार विजेते मंचावर उपस्थित होते.
आसाराम लोमटे यांना  त्यांच्या आलोक या लघुकथा साहित्यासाठी मराठी भाषेतील सर्वोत्कृष्ट पुस्तक म्हणुन साहित्य अकादमी पुरस्काराने पुरस्कृत करण्यात आले.आलोक या लघुकथेमध्ये  महाराष्ट्रातील  ग्रामीण जीवनशैली मांडली आहेत. ग्रामीण भागातील जीवनशैलीमध्ये आलेले व्यापक परिवर्तन हे सशक्त तसेच वस्तुनिष्ठरीत्या आलोकमध्ये प्रस्तुत केलेले आहे. यामध्ये गावातील लोकभाषा  स्थानीक परपंरा अतिशय अलगदपणे मांडली आहे. यासह ग्रामीण लोकांना येणा-या जटीलतेविषयीही सांगण्यात आले आहे.
आसाराम लोमटे यांचा जन्म महाराष्ट्रातील गुगळी धमनगांव येथे झाला. मराठी साहित्यात त्यांनी पदवीत्तोर तथा डॉक्टरेट  पुर्ण केले आहे. सध्या ते मराठीतील लोकसत्ता या प्रथीतयश वर्तमानपत्रात पत्रकार म्हणुन कार्यरत आहेत.  श्री लोमटे यांचे  इडा पिडा टळो, आलोक, धूळपेर हे तीन लघुकथा संग्रह प्रकाशीत झाले आहेत. त्यांच्या लिहीलेल्या कथा या पुणे विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ, स्वामी रामानंद तीर्थ विद्यापीठातील अभ्यासक्रमात आहेत.  
श्री लोमटे यांना  महाराष्ट्र फाउंडेशनचा ग्रंथ गौरव,  पद्मश्री विट्ठलराव विखे पाटिल साहित्य पुरस्कार, भैरव रतन दमानी पुरस्कार, महाराष्ट्र साहित्य परिषदचा जी.एल. ठोकळ पुरस्कार, पा.वा. गाडगीळ पुरस्कार आणि  मानवी हक्कवार्ता पुनस्काराने सन्मानित केलेले आहे.

यासह इंग्रजी भाषेतील साहित्य प्रकारासाठी मुंबईतील जेरी पिंटो यांनाही सन्मानित करण्यात आले. ते परेदशात असल्यामुळे त्यांच्यावतीने त्यांच्या प्रकाशकाने हा पुरस्कार स्वीकारला, जेरी पिंटो यांच्या एम एण्ड द बीग हुम या कादंबरीसाठी पुरस्कृत करण्यात आले. ही कादंबरी एक कुटूंबातील चार सदस्यांवरील व्यक्तींरेखांवर आधारीत असून यामध्ये आईची अत्याधिक अस्थिर मानसिक स्थिती मांडलेली आहे.

अनेकएकया गुजराती भाषेतील विविध विषयांवर आधारीत काव्य संग्रहासाठी मुंबईत राहणारे कमल वोरा यांनाही आज साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कोंकणी भाषेतील काळें भांगार कादंबरीसाठी एड्वीन जे.एफ.डिसोजा यांना पुरस्कृत करण्यात आले. ही कादंबरी  खाड़ी देशातील तेल आक्रमणामध्ये फसलेल्या मंगळुरू आणि कुवैत  मध्यमवर्गीय कुंटूबावर आधारीत आहे.

देशातील २4 प्रादेशिक भाषांतील विविध साहित्य प्रकारात सर्वोत्कृष्ट पुस्तकांच्या लेखकांनाही आज पुरस्कृत करण्यात आले. 1 लाख रूपये रोख, ताम्रपत्र आणि शाल असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. पुरस्कार प्राप्त साहित्यांमध्ये आठ काव्य संग्रह, सात लघुकथा संग्रह, पाच कांदबरी, दोन समिक्षा, एक निबंध यासह एक नाटक यांचा  समावेश आहे.


No comments:

Post a Comment