Friday 3 March 2017

मुंबई व पुणे येथील सैन्य रुग्णालय ठरले देशात सर्वोत्तम











                   
नवी दिल्ली, ३ : मुंबई येथील नवदलाचे आयएनएचएस अश्विनी सैन्य रुग्णालय देशातील सर्वोत्तम सैन्य हॉस्पीटल ठरले असून पुणे येथील कंमाड रुग्णालयाने  दुस-या क्रमांकाचा बहुमान मिळवला. संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते  उभय रुग्णालयांचा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला.
            लष्कर, वायुदल आणि नौदल या तीन दलांमध्ये सर्वोत्त आरोग्य सेवा देणा-या रुग्णालयांना संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांच्या हस्ते वर्ष २०१६ चे रक्षामंत्री चषक व प्रमाणपत्र गुरुवारी  प्रदान करण्यात आले. लष्कर प्रमुख बिपीन रावत यांच्यासह वायुदल व नौदलाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
            देशातील सर्वोत्तम सैन्य रुग्णालयाचा पुरस्कार मुंबई येथील नवदलाच्या आयएनएचएस अश्विनी या रुग्णालयाला प्रदान करण्यात आला. रुग्णालयाचे सर्जन रिअर ॲडमीरल रवी कालरा यांनी संरक्षण मंत्री पर्रीकर यांच्याकडून रक्षामंत्री चषक व प्रमाणपत्र स्वीकारले. दुस-या क्रमांकाचा पुरस्कार पुणे आणि उधमपूर येथील सैन्य रुग्णालयाला विभागून प्रदान करण्यात आला. पुणे कमांड रुग्णालयाचे मेजर जनरल आर. ग्रेरवाल यांनी संरक्षणमंत्र्यांकडून रक्षामंत्री चषक व प्रमाणपत्र स्वीकारले.
यावेळी श्री. पर्रिकर यांनी उपस्थितांना संबोधीत केले. देशातील  सैन्य रुग्णालयांमध्ये अत्याधुनिक सेवा पुरविण्यासाठी संरक्षण मंत्रालय कार्यरत असल्याचे त्यांनी  सांगितले. सर्वोत्तम आरोग्य सेवेसाठी रक्षामंत्री चषक पटकविणा-या विजेत्यांचे अभिनंदन करून उत्तमोत्तक कार्य करण्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.

आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी करणा-या सैन्य दलाच्या रुग्णालयांना १९८९ पासून दरवर्षी रक्षामंत्री चषक प्रदान करण्यात येते.   

No comments:

Post a Comment