नवी
दिल्ली, १० : दिल्ली पोलीस भरतीसाठी महाराष्ट्र
राज्यातील युवकांची गैरसोय टाळण्यासाठी नागपूर येथे निवड प्रक्रिया केंद्रास
मंजुरी देण्यात आल्याची माहिती केंद्रीय
गृह राज्यमंत्री हंसराज अहीर यांनी आज दिली.
दिल्ली पोलीस दलात ६ हजार ६५८ पोलीस
शिपाई पदांसाठी भरती होणार असून राज्यातील युवकांना निवड प्रक्रियेसाठी दिल्ली
येथे जावे लागणार होते. युवकांची ही अडचण दूर करण्यासाठी श्री. अहीर यांनी नागपूर
येथे निवड प्रक्रिया केंद्रास मंजुरी देण्याची
सूचना दिल्ली पोलीस आयुक्तांना केली होती. ही सूचना मान्य करण्यात आली .
दिल्ली पोलीस दलात ४ हजार ४४८ पुरूष
पोलीस शिपाई आणि २ हजार २१० महिला पोलीस शिपाई अशा एकूण ६ हजार ६५८ पदांसाठी भरती
प्रक्रिया सुरु झाली आहे. केंद्रीय कर्मचारी आयोगाच्या( स्टाफ सिलेक्शन कमीशन) वतीने या पदांसाठी अर्ज मागविण्यात
आले आहेत. राज्यातील उमेदवारांसाठी नागपूर येथे निवड प्रक्रिया होणार असून या
अंतर्गत लेखी व शारीरिक चाचणी घेण्यात
येणार असल्याचे श्री. अहीर यांनी सांगितले.
0000
No comments:
Post a Comment