Monday, 20 March 2017

महाराष्ट्र परिचय केंद्राचे काम इतर राज्यांसाठी उत्तम आदर्शवत

                           
                                                                                                



  
नवी दिल्ली , 20 : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने राज्य शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे करण्यात येणारे कार्य कौतुकास्पद असून इतर राज्यांसाठी एक उत्तम उदाहरण असल्याचे मत, कर्नाटक राज्य माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरण समितीचे अध्यक्ष तसेच माजी सनदी अधिकारी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांनी आज व्यक्त केले.

            कर्नाटक राज्याच्या माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरणासाठी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांच्या अध्यक्षतेखाली चार सदस्यीय समिती दिल्ली अभ्यास दौ-यावर असून या समितीने आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली, यावेळी एम.आर. श्रीनिवासमूर्ती यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी या समितीतील सर्व सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

            एम.आर. श्रीनिवासमूर्ती म्हणाले, महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे दिल्लीस्थित महाराष्ट्र परिचय केंद्र या कार्यालयाव्दारे राज्याची  प्रतिमा विस्तारीत रूपात उंचविण्याचे अप्रतिम काम होत असल्याची प्रतिक्रीया व्यक्त केली.

            या पथकात दैनिक प्रजावाणी चे माजी संपादक राजा शैलेशचंद्र गुप्ता, द विक साप्ताहिकाचे  दिल्लीतील निवासी संपादक सच्चिदानंद मुर्ती, कर्नाटक राज्य माहिती संचालक एन.आर  विष्णुकुमार आणि उपसंचालक एच.बी.दिनेश यांचा समावेश होता.    
           
महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी समितीच्या सर्व सदस्यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने समिती सदस्यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन समिती सदस्यांनी कामाची एकूण माहिती जाणून घेतली. समितीने  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामा बद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.           

माहिती विभागाच्या समितीची महाराष्ट्र सदनालाही भेट



कर्नाटक राज्य माहिती व जनसंपर्क विभागाच्या बळकटीकरण समितीने कस्तुरबा गांधी मार्गस्थित महाराष्ट्र सदनालाही भेट दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राव्दारे समन्वय करण्यात येणा-या खासदार समन्वय कक्षाची माहिती श्री कांबळे यांनी समिती सदस्यांना दिली. यासह सदनात असणारे परिचय केंद्राच्या ग्रंथालयाच्यावतीने राबविण्यात येणारे उपक्रमांचीही माहिती दिली. तसेच आयोजित पत्रकार परिषदा दरम्यान कार्यालयाव्दारे वहन करण्यात येणा-या जबाबदारीबद्दल श्री कांबळे यांनी समिती सदस्यांना अवगत केले. 

No comments:

Post a Comment