नवी दिल्ली, 22 : अंतराराष्ट्रीय पातळीवर मान्यता प्राप्त व्यवसायीक छायाचित्रकार मुंबईचे
अतुल चौबे आणि कोल्हापूरचे दिपक कुभांर यांना आज केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री
वैंकय्या नायडू यांच्या हस्ते राष्ट्रीय
छायाचित्र पुरस्कार प्रदान करण्यात आले.
माहिती व
प्रसारण मंत्रालयाच्या फोटो प्रभागच्यावतीने राष्ट्रीय माध्यम केंद्रामध्ये 6 व्या
राष्ट्रीय छायाचित्रकार पुरस्काराच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी
केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री वैंकय्या नायडू, केंद्रीय माहिती व प्रसारण
राज्य मंत्री राज्यवर्धन राठोड, केंद्रीय माहिती विभागाचे सचिव अजय मित्तल, छायाचित्र
स्पर्धा समितीचे अध्यक्ष एस.एन. सिन्हा, पत्र सुचना कार्यालयाचे प्रधान महासंचालक,
फोटो प्रभागचे अभिषेक दयाल मंचावर उपस्थित होते.
यावर्षी फोटो
प्रभाच्यातर्फे आयोजित छायाचित्र स्पर्धेचे विषय ‘कौशल्य भारत, तसेच ‘स्वच्छ भारत अभियान’ हे होते. यासाठी देशभरातील हजारो छायाचित्रकारांनी यामध्ये भाग घेतला.
त्यामधून 12 छायाचित्रकारांच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली आहे.
अतुल चौबे यांच्या
जन्म मध्यप्रदेशातील असून त्यांची कर्मभूमी मुंबई आहे. श्री चौबे यांना भारत
शासनाच्या महत्वकांक्षी उपक्रम ‘कौशल्य भारत’चे विविध अंगाने उत्कृष्ट छायाचित्रण केल्याबद्दल पुरस्कृत करण्यात आले. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र,
तसेच 15 हजार रूपये रोख असे आहे. श्री चौबे यांना या आधी 2012 मध्येही फोटो
प्रभागच्यावतीने आयोजित राष्ट्रीय स्पर्धेत पुरस्कार प्राप्त झालेला आहे. पुरस्कार
स्वीकारल्यानंतर दिलेल्या प्रतिक्रीयेत श्री चौबे म्हणाले, ‘भारत
शासनाच्यावतीने मिळणारा हा पुरस्कार मला दुस-यांदा मिळालेला असून यामुळे उत्साह
व्दिगुणीत झालेला आहे.’ श्री चौबे यांना छायाचित्रासाठी
आतापर्यंत विविध संस्थेतर्फे जवळपास 150 पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
कोल्हापूरचे
दिपक कुभांर यांना भारत सरकारच्या अतिशय महत्वकांक्षी ‘स्वच्छ भारत’ या विषयाच्या वर्गात अव्यावसायिक श्रेणीमध्ये विशेष उल्लेख पुरस्कार
मिळालेला आहे. या श्रेणीत हजारो छायाचित्रे प्राप्त झाली होती. त्यामधून श्री
कुभांरच्या छायाचित्रांची निवड करण्यात आली. पुरस्कार प्राप्तीनंतर भावना व्यक्त
करतांना श्री कुभांर म्हणाले, ‘भारत शासनाच्या फोटो
प्रभागकडून मिळालेल्या राष्ट्रीय पुरस्काराचा विशेष आनंद आहे असे मनोगत व्यक्त
केले’. पुरस्काराचे स्वरूप सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र, तसेच
10 हजार रूपये रोख असे आहे. श्री कुभांर
मुक्त छायाचित्रकार म्हणुन काम करतात. त्यांना विविध खाजगी संस्थांतर्फे त्यांच्या
उत्कृष्ट छायाचित्रणासाठी गौरविण्यात आलेले आहे.
यासह
यावर्षी ज्येष्ठ छायाचित्रकार रघु राय यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात
आले.
No comments:
Post a Comment