Thursday 23 March 2017

मुंबई हार्बर चॅनल व जेएनपीटी चॅनलच्या खोलीकरण व रूंदीकरणासाठी खर्चास मंजुरी



नवी दिल्ली, 23 : मुंबई येथील हार्बर चॅनल व जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) चॅनलच्या(दुसरा टप्पा) खोलीकरण व रूंदिकरणासाठी  २०२९ कोटींच्या खर्चास केंद्रीय कॅबीनेटच्यो बैठकीत मंजुरी देण्यात आली.
            प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी केंद्रीय कॅबीनेटच्या अर्थविषय समितीने मुंबईच्या हार्बर चॅनल व जेएनपीटी चॅनल(दुसरा टप्पा)च्या प्रस्तावीत खोलीकरण व रूंदीकरणाच्या कामासाठी २०२९ कोटींच्या खर्चास मंजुरी दिली. हा खर्च सेवा शुल्क विरहीत असेल. या प्रकल्पांच्या प्रस्तावित कामांसाठी येणा-या खर्चाचे वहन जेएनपोर्ट ट्रस्टच्या अंतरिक वित्तीय स्त्रोतांमधून करण्यात येईल, शिवाय गरज पडल्यास बाजारातून कर्ज घेण्यात येईल असे पत्र सूचना कार्यालयाच्या प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.
            या कामांअर्तगत सध्यस्थितीतील चॅनलची ३७० मिटरची रूंदी वाढवून ४५० मिटर करण्यात येईल. जेएनपीटीची विद्यमान कंटेनर हाताळणी क्षमता ही ५ दशलक्ष टीईयु(ट्वेंटी फीट इक्वालँट युनीट) असून येथे चार टर्मीनल सुरु झाल्यास ही क्षमता वाढून ९.८ दशलक्ष टीईयु होईल. या कामांसाठी जागतिकस्तराहून निवीदा मागविण्यात येणार असून दोन वर्षाच्या कालावधित हे काम पूर्ण करण्यात येणार आहे.
              प्रस्तावीत खोलीकरण व रुंदीकरणाच्या कामांमुळे १२,५०० टीईयु क्षमतेचे मोठे जहाज हाताळणे शक्य होणार आहे. याशिवाय आर्थिक लाभही होणार आहे. जहाजासाठी कराव्या लागणा-या प्रतिक्षा वेळ कमी होईल. ट्रांसशिपमेंट खात्यात बचत होणार आहे.  प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष कर कमी होईल, उपभोगकर्त्यासही लाभ होईल आणि जीएनपीटीवरील जहाजांची गर्दी कमी होईल.   

                                     0000000 

No comments:

Post a Comment