नवी दिल्ली, 04 : स्वच्छता
सर्वेक्षणाचा निकाल आज केंद्रीय नगरविकास मंत्री व्यंकय्या नायडू यांनी जाहीर
केला. देशातल्या पहिल्या 10 स्वच्छ शहरामध्ये नवी मुंबई 8 व्या स्थानावर आहे.
महाराष्ट्रातील एकूण 44 शहरे स्वच्छता सर्वेक्षणाच्या यादीत समाविष्ट आहेत.
स्वच्छ
सर्वेक्षण-2017 अंतर्गत देशभरात केलेल्या सर्वेक्षणात 434 शहरे स्वच्छतेच्या
क्रमवारीत समाविष्ट करण्यात आली आहेत. या यादीत महाराष्ट्रातील 44 शहरांचा समावेश
आहे.
मराठवाड्यातील 8 शहरांचा समावेश
मराठवाडा
विभागातील 8 शहरे देशाच्या स्वच्छता यादीत समाविष्ट आहेत. शहरांची नावे (क्रमावरीसह)
पुढील प्रमाणे :
नांदेड वाघाळा (192), उस्मानाबाद (219), परभणी (229), उदगीर (240),
औरंगाबाद (299), बीड (302), लातूर (318), जालना (368).
विदर्भातील 9 शहरांचा समावेश
विदर्भ
विभागातील 9 शहरे देशाच्या स्वच्छता यादीत समाविष्ट आहेत. शहरांची नावे
(क्रमावरीसह) पुढील प्रमाणे :
चंद्रपूर (76), नागपूर (137), यवतमाळ (230), अमरावती (231), अकोला
(296), अचलपूर (311), वर्धा (313), गोंदिया (343), हिंगणघाट (355).
स्वच्छता यादीत महाराष्ट्रातील इतर 27
शहरांची नावे (क्रमावारीसह) पुढील प्रमाणे
नवी
मुंबई (8), पुणे (13), बृहन्मुंबई (29), शिर्डी (56), पिंपरी चिंचवड (72), अंबरनाथ
(89), सोलापूर (115), ठाणे (116), धुळे (124), मिरा भाईंदर (130), वसई विरार (139),
इचलकरंजी (141), नाशिक (151), सातारा (157), कुलगांव बदलापूर (158), जळगांव (162),
पनवेल (170), कोल्हापूर (177), अहमदनगर (183), उल्हासनगर (207), कल्याण-डोंबिवली (234),
सांगली-मिरज कुपवाड (237), मालेगांव (239), भिवंडी निझामपूर (392), भुसावळ (433).
No comments:
Post a Comment