Tuesday, 9 May 2017

तंत्रज्ञानाच्या माध्यमातून पारदर्शक प्रशासन: मुख्यमंत्री



















नवी दिल्ली, 09 : राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी तंत्रज्ञानाच्यामाध्यमातून सर्वसमावेशक, उत्तरदायी आणि पारदर्शक प्रशासन निर्माण करण्यातयेत आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नवी दिल्ली येथे केले.
            ओरॅकल ओपन वर्ल्ड याओरॅकल कंपनीने आयोजित केलेल्या परिषदेत मुख्यमंत्री बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यावेळी `टेक्नॉलॉजी ट्रान्सफॅारमेशन लीडरशिपया पुरस्काराने ओरॅकल कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सॅफरा कॅट्झ यांच्या हस्ते गौरविण्यात आले.मुख्यमंत्र्यांनी थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी), आधार,आपले सरकार याबाबत या परिषदेत सविस्तर माहिती दिली.
     मुख्यमंत्री म्हणाले, महाराष्ट्र हे देशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. राज्यातील प्रशासन जनतेप्रती उत्तरदायी बनविण्यासाठी तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यावर भर देण्यात येत आहे. नागरिकांना सेवा पुरविणारी यंत्रणा म्हणून शासन कार्यरत असूनआपले सरकार या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना सर्व सेवा देण्यात येत आहेत. आतापर्यंत 370 सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देण्यात आल्या आहेत.
`डिजीटल रोड` तयार करण्यावर भर
     राज्यशासनाने 14 हजार ग्रामपंचायती महा-नेट च्या माध्यमातून ऑप्टिकल फायबरद्वारे जोडल्या आहेत.उर्वरित 15 हजार ग्रामपंचायती सुद्धा लवकरच जोडल्या जातील. राज्य शासनामार्फत गावपातळीपर्यंत `डिजीटल रोडही संकल्पना विकसित करीत आहे. गावपातळीपर्यंतची सर्व कार्यालये, शाळा, आरोग्य केंद्र आदी सर्व यंत्रणा डिजीटल करण्यावर राज्य शासन भर देत आहे. राज्याच्या समृद्धीसाठी डिजीटल रोड ही संकल्पना महत्त्वाची ठरणार आहे, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.

     नागरिकांना जलद उत्तम सेवा देणे हे शासनाचे कर्तव्य आहे.नागरिकांना देण्यात येणाऱ्या सेवा पारदर्शक असणे महत्त्वाचे आहे, असे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले, कोणतेही शासकीय कार्यालय नागरिकांना प्रमाणपत्रांसाठी दुसऱ्या कार्यालयात पाठविणार नाही अशी यंत्रणा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहे.प्रत्येक शासकीय कार्यालयात नागरिकांच्या दस्तावेजांचे डिजीटायझेशन केले जाणार आहे. त्यामुळे यापुढील काळात नागरिकांना शासनाकडे हेलपाटे मारण्याची गरज असणार नाही.

No comments:

Post a Comment