श्री.
मुनगंटीवार यांनी आज उद्योग भवन येथे केंद्रीय वाणिज्य व उद्योग मंत्री निर्मला
सितारमन यांची भेट घेतली. यावेळी झालेल्या बैठकीत त्यांनी ही मागणी केली तसेच
विविध मुद्यांवरही चर्चा केली .
श्री. मुनगंटीवार म्हणाले, विदर्भातील
वन आच्छादित भागात मोठया प्रमाणात अगरबत्ती तयार करण्यात येते. अगरबत्ती उद्योगाला
प्रोत्साहन देण्यासाठी बांबुला लागणारा ट्रान्सीट पास वनविभागाच्यावतीन पूर्णपणे
बंद करण्यात आला आहे. ताडोबा, गडचिरोलीसह राज्यातील अनेक जिल्ह्यांत अगरबत्ती तयार
करण्यात येते. सध्या व्हिएतनाम आणि चीन मधून अगरबत्ती आयात करण्यात येते. त्यामुळे,
स्थानीक उत्पादकांचे मोठया प्रमाणात नुकसान होते. सध्या अगरबत्तीवर असलेला ९ टक्के
आयात शुल्क हा २५ ते ३० टक्यांनी वाढविण्याची मागणी श्री मुनगंटीवार यांनी केली, श्रीमती निर्मला सितारमन यांनी याबाबत
सकारात्मकपणे विचार करण्याचे आश्वासन दिले.
नक्षलप्रभावित जिल्हयांमध्ये प्रस्तावित
‘फॉरेस्ट इंडस्ट्रीयल
झोन’ला करांमधून सुट मिळावी
विदर्भातील गडचिरोली,
चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया या जिल्हयांमध्ये तरुणांना रोजगार उपलब्ध करून
देण्यासाठी प्रस्तावित असलेल्या ‘फॉरेस्ट
इंडस्ट्रीयल झोन’ला विविध करांमधून सुट देण्यात यावी, अशी
मागणीही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी केली. विदर्भातील हा भाग नक्षलप्रभावित
असल्यामुळे स्थानिक तरूणांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहन मिळावे, म्हणून येत्या ५ वर्षांसाठी आयकर, व्हॅट आणि जीएसटी या
करांमधून सुट देण्यात यावी, अशी मागणी श्री. मुनगंटीवार यांनी केली. यासंदर्भात
सकारत्मकता दर्शवत केंद्रीय मंत्रालयाकडे योग्य तो पाठपुरावा करण्यात येणार
असल्याचे श्रीमती सितारमन यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment