Wednesday 16 August 2017

‘म-हाटी’ महाराष्ट्र एम्पोरियम मध्ये गणेशमुर्तींच्या प्रदर्शन व विक्रीला सुरुवात









नवी दिल्ली, 16 : महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाच्या दिल्लीस्थित म-हाटी महाराष्ट्र एम्पोरियमच्या दालनात आज पासून गणेशमुर्ती व पुजेच्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीला सुरुवात झाली आहे, गणेशमुर्ती  विक्री  २५ ऑगस्ट पर्यंत सुरु राहणार आहे.

            महाराष्ट्रातील मुर्तीकारांच्या कलेला वाव मिळावा व त्यांच्या मुर्त्यांना बाजारपेठ उपलब्ध व्हावी तसेच, दिल्लीतील मराठी व अमराठी गणेशभक्तांना गणेशमुर्ती उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने दिल्लीस्थित महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळातर्फे गेल्या 24 वर्षांपासून गणेशमुर्ती व पुजेच्या साहित्याचे विक्री व प्रदर्शन भरवण्यात येत आहे. दिल्ली व राष्ट्रीय राजधानी क्षेत्रात जवळपास 39 गणेश मंडळांत गणेशोत्सव साजरा होतो. त्यासोबतच  अमराठी जनतेचाही गणेशोत्सवात मोठया प्रमाणात सहभाग वाढला आहे. त्यामुळे एम्पोरियममध्ये गणेशमुर्ती व पुजेचे साहित्य खरेदीसाठी लोकांची लगबग दिसून येत असल्याचे महाराष्ट्र लघु उद्योजक विकास महामंडळाच्या निवासी व्यवस्थापकांनी सांगितले.  

         ठाण्यातील मंदार सुर्यकांत शिंदे हे मागील 18 वर्षांपासून गणेशमूर्ती विक्रीकरिता दिल्लीतील म-हाटीएम्पोरियमध्ये येतात. यंदा लहान मोठया आकाराचे एकुण 1200 गणेशमुर्ती येथे आहेत. यात 1000 मुर्त्या इकोफ्रेंडली आहेत तर उर्वरीत २०० मुर्त्या प्लॅस्टर ऑफ पॅरीसच्या आहेत. 6 इंच ते 6 फुटापर्यंतच्या गणरायाच्या मूर्ती येथे उपलब्ध आहेत. 600 रूपयांपासून ते 30 हजार रूपयांपर्यंत गणेशमुर्तींची किंमत आहे. दिल्लीस्थित त्रिभूवनदास जव्हेरी, नंदा एस्कोर्ट व सरीन कंपनी आदिंसह  काही गणेश मंडळांनी मोठया गणरायाच्या मूर्ती आधीच ऑनलाइन पध्दतीने राखीव करून ठेवल्या आहेत.

महामंडळाच्या बाबाखडकसिंह मार्गवरिल म-हाटी महाराष्ट्र एम्पोरियम या दालनात गणेशचतुर्थी अर्थात दिनांक 25   ऑगस्ट पर्यंत सकाळी 10 ते सायंकाळी 8 वाजेपर्यंत हे प्रदर्शन व विक्री सुरु राहणार आहे. अधिक माहिती करिता 011-23363888 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क करता येवू शकतो.

  महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :
000000000

No comments:

Post a Comment