नवी दिल्ली, 16 : ‘शासनातील जनसंपर्क’ विषयावर राष्ट्रीय कार्यशाळेचे आयोजन करून महाराष्ट्र परिचय केंद्राने राष्ट्रीय राजधानीत उत्तम पायंडा पाडला आहे. राज्य शासनाच्या प्रतीमा निर्मितीचे कार्य परिचय केंद्र उत्तम प्रकारे करीत असल्याच्या भावना व्यक्त करत सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला यांनी परिचय केंद्राच्या कार्याचे कौतुक केले.
श्रीमती शुक्ला यांनी आज परिचय केंद्राला भेट
दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे
स्वागत केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा,उपसंपादक रितेश भुयार आणि दैनिक
सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी
यावेळी उपस्थित होते.
परिचय
केंद्राच्यावतीने शासनातील जनसंपर्क विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा
उपक्रम स्तुत्य आहे. याद्वारे नवमाध्यमांच्या जगात जनसंपर्क क्षेत्रात करावयाचे
बदल तसेच विविध राज्यांतील जनसंपर्क विषयक कार्यातील सकारात्मक उपक्रमांची देवाण
घेवाण होते असे श्रीमती शुक्ला म्हणाल्या. महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने
दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने
आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्रीमती शुक्ला यांना दिली. महाराष्ट्र परिचय
केंद्राच्या कामा बद्दल श्रीमती शुक्ला यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा
दिल्या.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा :
000000000
No comments:
Post a Comment