नवी
दिल्ली दि. 3 :
क्रांतिसिंह नाना पाटील यांची 117 वी जयंती महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्रात
साजरी करण्यात आली.
कोपर्निकस
मार्ग स्थित महाराष्ट्र सदनातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात निवासी आयुक्त तथा सचिव
आभा शुक्ला यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून
अभिवादन केले. यावेळी राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी, सुमन चंद्रा,
व्ही.टी. कायरकर, अजितसिंग नेगी यांच्यासह महाराष्ट्र सदन तसेच महाराष्ट्र परिचय
केंद्राचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थित अधिकारी कर्मचा-यांनीही
यावेळी प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
महाराष्ट्र परिचय केंद्रात क्रांतिसिंह नाना
पाटील यांना अभिवादन
महाराष्ट्र परिचय केंद्रात आयोजित कार्यक्रमात
क्रांतिसिंह नाना पाटील यांना अभिवादन करण्यात आले. परिचय केंद्राचे उपसंचालक
दयानंद कांबळे यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर अरोरा, माहिती
अधिकारी अंजु निमसरकर-कांबळे, यांच्यासह उपस्थित कर्मचा-यांनी यावेळी क्रांतिसिंह नाना
पाटील यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
No comments:
Post a Comment