Monday, 14 August 2017

महाराष्ट्र सदनात ‘स्वातंत्र्य दिन’ साजरा


नवी दिल्ली, 15 : भारताचा 71 वा स्वातंत्र्य दिनराजधानीतील महाराष्ट्र सदन येथे मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला यांच्या हस्ते कस्तुरबा गांधीमार्ग आणि कोपर्निकस मार्गावरील दोन्ही महाराष्ट्र सदनात ध्वजारोहण करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रगीत झाले. महाराष्ट्र सुरक्षा पोलीसांच्या तुकडीने यावेळी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
        या कार्यक्रमास राजशिष्टाचार तथा गुंतवणूक आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, सहायक निवासी आयुक्त सुमन चंद्रा, व्ही.टी. कायरकर, अजित सिंग नेगी, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्यासह महाराष्ट्र सदन व महाराष्ट्र परिचय केंद्राचे अधिकारी-कर्मचारी मोठया संख्येने यावेळी उपस्थित होते. सदनातील निवासी अतिथी तसेच, दिल्लीस्थित विविध  क्षेत्रातील मराठी भाषिकही ध्वजारोहण कार्यक्रमास उपस्थित होते.


        राजधानीतील लाल किल्ल्यावर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहणाचा मुख्य कार्यक्रम  झाला. स्वातंत्र्य दिनानिमित्त राजधानी दिल्लीमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले आहे.

No comments:

Post a Comment