नवी दिल्ली : पंडित दिनदयाळ उपाध्याय यांच्या जयंती निमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सदनात आयोजित कार्यक्रमात पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
यावेळी महिला व बाल विकास मंत्री पंकजा मुंडे, आदिवासी विकास मंत्री विष्णु सवरा, वैद्यकीय शिक्षण व जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री गिरीष महाजन, कृषी व फलोत्पादन मंत्री पांडुरंग फुंडकर, पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्री राजकुमार बडोले, उद्योग आणि खनिकर्म, पर्यावरण सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) राज्यमंत्री प्रवीण पोटे, ऊर्जा, पर्यटन, अन्न व औषध प्रशासन राज्यमंत्री मदन येरावार यांच्यासह सर्वश्री आमदार शिवाजीराव कर्डिले, नारायण कुचे, हरीभाऊ जावळे, आर.टी. देशमुख, पास्कल धनारे, ऍड. संजय धोत्रे, राजेंद्र पाटणी, बंटी भांगडीया, सुरेश भोळे, डॉ. मिलिंद माने, संजय पवार, सेल्वन कॅप्ट. आर. तमिल, चंदूभाई पटेल, गिरीश व्यास आदी. पं. उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून आदरांजली वाहिली.
निवासी आयुक्त तथा सचिव आभा शुक्ला, गुंतवणुक तथा राजशिष्टाचार आयुक्त लोकेश चंद्र, अपर निवासी आयुक्त समीर सहाय, महाराष्ट्र परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांच्या सह अन्य अधिकारी-कर्मचारीही उपस्थित होते, यांनीही यावेळी पं. दिनदयाळ उपाध्याय यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण अभिवादन केले.
No comments:
Post a Comment