नवी दिल्ली,
०८ : विविध उपक्रमांचे आयोजन आणि समाजमाध्यमांचा प्रभावी उपयोग करून राजधानीत
महाराष्ट्र शासनाच्या प्रतीमा निर्मितीचे कार्य महाराष्ट्र परिचय
केंद्र उत्तम प्रकारे करीत असल्याच्या भावना व्यक्त करत लातूर जिल्हयातील उदगीर
विधानसभा मतदार संघाचे आमदार सुधाकर भालेराव यांनी परिचय केंद्राच्या कार्याचे
कौतुक केले.
श्री.
भालेराव यांनी आज परिचय केंद्राला भेट
दिली. परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन त्यांचे
स्वागत केले. ॲड. मुक्तेश्वर केशवराव धोंडगे,दैनिक
लोकमतचे जळकोट तालुका प्रतिनिधी एम.जे.मोमीन, अलाहबाद येथील मनोज सिंह आणि दैनिक केसरी
चे दिल्ली प्रतिनिधी कमलेश गायकवाड यावेळी
उपस्थित होते.
परिचय केंद्राच्यावतीने
शासनातील जनसंपर्क विषयावर राष्ट्रीय कार्यशाळा आयोजित करण्याचा उपक्रम स्तुत्य
आहे. याच बरोबर आधुनिक माध्यमांच्या युगाची पाऊले ओळखून कार्यालयाने समाज
माध्यमांचा प्रभावी उपयोग केला असल्याचे श्री. भालेराव म्हणाले. दिल्ली स्थित विविध
राज्यांच्या जनसंपर्क विभागांसोबत संपर्क व समन्वय साधून जनसंपर्क विषयक कार्यातील
सकारात्मक उपक्रमांच्या देवाण घेवाणीतही या कार्यालयाचा पुढाकार कौतुकास्पद
असल्याचे श्री. भालेराव म्हणाले.
महाराष्ट्र
परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात
येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची
माहिती श्री. कांबळे यांनी श्री. भालेराव यांना
दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय केंद्राची प्रकाशने श्री. भालेराव यांना भेट
स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध
विभागांना भेट देऊन श्री. भालेराव यांनी माहिती जाणून घेतली. श्री. भालेराव यांनी
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
00000
No comments:
Post a Comment