Friday, 13 October 2017

दिवाळी निमित्ताने रेल्वे मंत्रालयाची महाराष्ट्राला अनोखी भेट !


दिल्ली मुंबई दरम्यान आठवड्यातून तीनवेळा विशेष राजधानी

नवी दिल्ली, 13 : दिल्ली मुंबई दरम्यान आता आठवड्यातून तीनवेळा नवीन विशेष राजधानी येत्या 16 ऑक्टोबर पासून सुरु करण्यात येणार आहे, अशी घोषणा आज रेल्वे मंत्रालयाने केली.
            दिल्ली व मुंबईच्या प्रवाशांची अनेक वर्षांपासूनची जलद गती ट्रेन सुरु करण्याची मागणी  होती. या दिपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मंत्रालयाने  महाराष्ट्राची मागणी पूर्ण केली आहे. येत्या 16 ऑक्टोबर पासून हजरत निजामुद्दीन  ते बांद्रा टर्मिनस  आणि ब्रांद्रा टर्मिनस ते ह. निजामुद्दीन दरम्यान ही गाडी दोन्ही बाजूने बुधवार, शुक्रवार आणि शनिवार धावणार आहे.
            या गाडीच्या तिकीटांची बुकिंग केल्यावर फ्लेक्सी भाडे आकारले जाणार नाही. सध्याच्या राजधानी प्रवासास 15 तास 50 मिनिट लागतात. नवीन राजधानीचा प्रवास 13 तास 55 मिनिटाचा असणार आहे. यामुळे दोन तासाचा प्रवास कमी होणार आहे. या राजधानीच्या टिकिटाचे भाडे हे एसी 2 व 3 साठी सध्याच्या  राधानी पेक्षा फ्लेक्सी भाड्यापेक्षा 19 टक्के स्वस्त असणार आहे. या गाडीत केटरिंग सेवा पर्यायी असल्याने प्रवाशांना खानपान सेवेतून बाहेर पडण्याचा पर्याय असेल. 
                दिल्ली मुंबई रेल्वे मार्गावर सध्या दोन राजधानी व 30 मेल आणि एक्स्प्रेस गाड्या धावत आहेत.

नवीन राधानी एक्स्प्रेस दिल्ली मुंबई दरम्यानच्या प्रवासात केवळ कोटा वडोदरा सूरत असे 3 थांबे असणार आहेत.  ही गाडी तासी 130 कि.मी.वेगाने धावणार आहे.

No comments:

Post a Comment