Tuesday, 3 October 2017

“दृष्टी” या शॉर्ट फिल्मच्या चमूची परिचय केंद्रास भेट












नवी दिल्ली, 3 :    देशपातळीवर सर्वोत्कृष्ट ठरलेली दृष्टी या शॉर्ट फिल्मच्या चमूने आज महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट  दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या फिल्मला स्वच्छता ही सेवा या पुरस्काराने 2 ऑक्टोबर रोजी एका विशेष समारंभात गौरविण्यात आले होते.

            दृष्टी या शॉर्ट फिल्मसाठी ज्यांनी लेखन संहीता व संकल्पना तयार केली ते जमीर अत्तार व या फिल्मचे तांत्रिक बाजू सांभाळणारे शार्दूल आफळे, अक्षय हिरवे व बाल कलाकार मास्टर झिशान जमीर अत्तार  यांनी आज आवर्जून महाराष्ट्र परिचय केंद्रास भेट दिली. स्वच्छता हीच ईश्वर सेवा या भावनेतून जनजागृतीसाठी ही फिल्म तयार केली व माझ्या या संकल्पनेला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला याचा मनस्वी आनंद आहे अशी भावना जमीन अत्तार यांनी यावेळी बोलून दाखवली. या फिल्मचा बाल कलाकार झिशान अत्तार यांनी यावेळी स्वच्छेतचा अप्रतिम संदेश दिला. तो म्हणाला भारत हा आपला केवळ देश नसून ते आपले घर आहे. ज्याप्रमाणे आपण आपले घर स्वच्छ ठेवतो, त्याप्रमाणे  आपण आपला देश स्वच्छ ठेवला पाहिजे.


            यावेळी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी दृष्टी  या टीमचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.  


No comments:

Post a Comment