नवी
दिल्ली 11
: तुर डाळ आणि खाद्य तेलाच्या आयात-निर्यातीबाबत केंद्र शासनाने घेतलेल्या निणर्यांचा लाभ शेतक-यांना होत
असल्याची माहिती, महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी
दिली.
महाराष्ट्र राज्य कृषी मूल्य आयोगाचे
अध्यक्ष पाशा पटेल यांनी आज परिचय केंद्राला भेट दिली, त्यावेळी त्यांनी ही माहिती
दिली. वेगवेगळया कारणांनी तुर, मूग आणि उडीद
या डाळींच्या निर्यातीवर बंदी आणण्यात आली होती. यासह परदेशातून मोठया प्रमाणात खादय
तेल आयात करण्यात येत होते, त्यामुळे देशांतर्गत उत्पादन होणा-या तेलाचे भाव
पडायचे. यामुळे डाळ, तेल उत्पादक
शेतक-यांना मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागत होते.
तुळ डाळ आणि खाद्य तेल उत्पादक शेतक-यांची
यामुळे होणारी कुंचबणा थांबविण्यासाठी श्री पटेल यांनी राज्याचे मुख्यमंत्री
देवेंद्र फडणवीस यांना श्री पटेल यांनी सविस्तर माहिती दिली. मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी याबाबत
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून डाळी तसेच खाद्य तेलाबाबतची एकूण
परिस्थितीती अवगत केली.
प्रधानमंत्री श्री मोदी यांनी या संदर्भातील तथ्य
लक्षात घेऊन याबाबत केंद्रीय वित्तमंत्री अरूण जेटली यांच्या
अध्यक्षतेखाली उच्च अधिकार प्राप्त समिती नेमली ज्यात केंद्रीय भुपृष्ठ परिवहन
मंत्री नितिन गडकरी आणि केंद्रातील अन्य मंत्र्यांचा समावेश होता. या समितीने
केलेल्या अभ्यासातंर्गत शेतक-यांचे नुकसान होणार नाही असे धोरण आखले असून यातंर्गत
5 ऑगस्ट 2017 रोजी केंद्र शासनाने एक
महत्वाचा निर्णय घेतला तुर डाळी संदर्भात घेतला असून यामध्ये 2 लाख मेट्रीक टन
पेक्षा अधिक तुर डाळ आयातीवर बंदी आणली.
11 ऑगस्ट 2017 रोजी घेतलेल्या निर्णयानुसार आयात होणा-या खाद्यान्न तेलावर 10% टक्के आयात शुल्क लावायचे. 21 ऑगस्ट 2017 रोजी केंद्र शासनाने अधिसूचना
काढून मूग, उडीद या डाळी 1 लाख मेट्रीक टना पेक्षा जास्त आयात करण्यात येऊ नये असा
निर्णय घेतला. 15 सप्टेंबर 2017 रोजी निघालेल्या अधिसूचनेनुसार तुर, मूग आणि उडीद
या डाळीवर असणारी 12 वर्षापासूनची निर्यात बंदी उठवून देशातील शेतक-यांना निर्यात
करण्याची परवानगी दिली. या निर्णयांमुळे शेतक-यांना आर्थिक लाभ मिळण्याचे मार्ग
मोकळे झाले असल्याचे श्री पटेल यांनी स्पष्ट केले.
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी श्री पाशा पटेल
यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत
राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशित करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि
प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. कांबळे यांनी श्री.पटेल यांना दिली. यावेळी महाराष्ट्र परिचय
केंद्राची प्रकाशने श्री. पटेल यांना भेट स्वरूपात देण्यात आली. परिचय केंद्राचे
ग्रंथालय तसेच कार्यालयाच्या विविध विभागांना भेट देऊन श्री. पटेल यांनी यशस्वी
वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment