Monday, 9 October 2017

लोककलेला प्राधान्य दयावे : मंगला बनसोडे











नवी दिल्ली 9 : लोककला ही समाजाची कला असून लोककला आणि लोक कलावंत यांना प्राधान्य दयावे, अश्या भावना वयोश्रेष्ठ सम्मान पुरस्कार प्राप्त मंगला बनसोडे यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात व्यक्त केल्या.
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते आज मंगला बनसोडे यांच्या सृजनात्मक कलेच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी त्यांना वयोश्रेष्ठ सम्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले, या कार्यक्रमानंतर श्रीमती बनसोडे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली.  त्यावेळी त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
लोककला ही पीढयान-पीढया चालविण्याचे काम केले जाते. ती टिकून राहावी, समृद्ध व्हावी यासाठी आपल्याकडून आपण जीवंत असे पर्यंत प्रयत्नरत राहूच मात्र, जनतेने, शासनाने यासाठी मदत करावी,  असे केल्यानेच लोककला जीवंत राहील, असे त्या म्हणाल्या.
श्रीमती बनसोडे यांनी आपल्या एकूण कारर्कीदी बद्दल सांगितले. आईला पाहूनच मोठे झाले आणि आई सारखेच नृत्य करायचे अजाणत्या वयातच मनात निश्चित केले.’  आज त्या 65 वयाच्या असूनही कार्यक्रम सादर करतात.  त्यांच्या कुटूंबाला कलेच्या जोपासणेसाठी  हा तीसरा पुरस्कार प्राप्त झालेला आहे.  श्रीमती बनसोडे यांची ही पाचवी पीढी आहे जी लोकनाटय, लावणी, वगनाटयाच्या माध्यमातून मनोरंजन तसेच समाजप्रबोधनाचे काम करते.
प्रेक्षकांनी दिलेल्या दादेतूनच आजही नृत्य करण्याची  प्रेरणा मिळत असल्याचे त्यांनी कथन केले. यावेळी पोटासाठी नाचते मी पर्वा कुणाची या लावणीच्या काही ओळी त्यांनी म्हणून  दाखविल्या.
उपसंचालक दयानंद कांबळे यांनी मंगला बनसोडे यांचा पुष्पगुच्छ, शॉल, श्रीफळ देऊन गौरव केला. यावेळी कार्यक्रामास त्यांच्या कुटूंबातील सदस्य त्यांचा मुलगा नितिन बनसोडे, नातु उपस्थित होते. यासह पत्रकार, कार्यालयातील अधिकारी-कर्मचारी ही उपस्थित होते. कार्यक्रमाची प्रस्तावना उपसंचालक श्री कांबळे यांनी केले तर सुत्रसंचलन आणि आभार माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी मानले.


No comments:

Post a Comment