Thursday, 2 November 2017

मुंबईतील 4 स्थळांना युनेस्को वारसा पुरस्कार








नवी दिल्ली दि.2 : युनेस्को ने  1 नोव्हेंबरला आपल्या सांस्कृतिक वारसा पुरस्काराची घोषणा केली. सांस्कृतिक वारसा संवर्धनासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात येतो. आज आशिया-पॅसिफिक पुरस्काराची घोषणा युनेस्को ने केली आहे. भारतातील 7 वारसा स्थळांचा यामध्ये समावेश आहे. यातील 4 वारसा स्थळे ही मुंबईतील आहेत

       युनेस्कोने जाहीर केलेल्या युनेस्को वारसा पुरस्कारांमध्ये देशातील सात स्थळांचा समावेश आहे.यामध्ये १) श्री.रंगनाथस्वामी मंदिर ( श्रीरंगम, तामिळनाडू) 2) गोहड फोर्ट ( मध्यप्रदेश) 3) हवेली धर्मपुरा (दिल्ली) 

मुंबईतील 4 वारसा स्थळांचा युनेस्को पुरस्काराने सन्मान

युनेस्को च्या वारसा पुरस्कारांमध्ये मुंबईतील चार  वारसा स्थळांचा समावेश आहे . यामध्ये 1) ख्रिस्त चर्च (Christ church, भायखळा चर्च) 2) रॉयल बॉम्बे ऑपेरा हाऊस  या दोन वारसा स्थळांना गुणवत्ता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे, तर   बोमोनजी होरमर्जी वाडिया फौंटेन अँड  क्लॉक  टॉवर  आणि वेलिंग्टन फौंटेन या दोन वारसा स्थळास विशेष उल्लेखनीय पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. 

आशिया -पॅसिफिक क्षेत्रातील सांस्कृतिक वारसा स्थळाचे संवर्धन  करण्यासाठी स्थानिक नागरिक व खाजगी क्षेत्रातील संस्थांना संस्कृती संवर्धनासाठी प्रोत्साहन देण्यासाठी दरवर्षी युनेस्को सांस्कृतिक वारसा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.

No comments:

Post a Comment