Thursday, 2 November 2017

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये पाणी अभ्यासक्रम सुरू होणार : कुलगुरू डॉ.करमाळकर




नवी दिल्ली दि.2 :  सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामध्ये नेदरलँडच्या आयएचइ डेल्फट आणि युनिटि कन्स्लटंट प्रा. लि. यांच्या सहकार्याने पाणी अभ्यासक्रम सुरू होणार. याबाबत सांमज्यस करारावर सहया झालेल्या आहेत, अशी माहिती पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितिन करमाळकर यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्रात दिली.

      परिचय केंद्रात दिलेल्या भेटीच्या वेळी नेदरलँडचे रेक्टर डॉ. ऐडी मुर्झ, पर्यारवण अभियंता तथा पाणी तंत्रज्ञानाचे उपप्रमुख डॉ.निमानीया आणि युनिटी कन्सलटंट प्रा. लि. चे मुख्य व्यवस्थापकिय संचालक महेश पाठक, संस्थापक संचालक अनघा पाठक, तसेच पत्रकार कार्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. याप्रसंगी उपसंचालक दयानंद कांबळे यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

मानवी जीवनातील सर्वात महत्वाचा घटक पाणी आहे. पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत मर्यादित असून पाण्याबाबत संपुर्ण जागरूकता केल्याशिवाय भविष्यात सर्वांसाठी पाणी उपलब्ध होणे अवघड होणार आहे. यासाठी पाणी या विषयावर अभ्यासक्रम असणे अंत्यत गरजेचे आहे. या अभ्यासक्रमात पाण्याविषयी सविस्तर शिक्षण दिले जाईल, अशी माहिती श्री करमाळकर यांनी दिली.

नेदरलँडची आयएचई डेल्फट ही संस्था पाण्यावरील प्रक्रियेसाठी जगभर नावाजलेली आहे. भारतामधील काही राज्यातील जलबोर्डांसह या संस्थेने करार केलेला आहे. श्री ऐडी यावेळी म्हणाले, शुद्ध पाणी पिण्याने प्रतिकार क्षमतेसोबतच आर्युमानही वाढतेच व मनुष्य बळाचा योग्य वापरही करता येतो. सांडपाण्याच्या पाण्यावर प्रक्रिया करून पाण्याच्या दर्जानुसार या पाण्याचा पुर्नवापरही करता येऊ शकतो, हे प्रक्रिया केलेले पाणी उद्योगांसाठी, शेतीसाठी तसेच अन्य ठिकाणी वापता येऊ शकते. असे, ऐडी यांनी सांगितले.


पाणी या विषयावर विविध 60 अभ्यासक्रम असु शकतात. पाण्याच्या या अभ्यासक्रमामुळे स्वंय रोजगारासह अनेक रोजगार भविष्यात उपलब्ध होतील. या अभ्यासक्रमांमध्ये पाण्याच्या महत्वासोबत त्याची गुणवत्तेच्या वाढीवर संशोधन होईल. नेदरलँड सोबत झालेल्या पाणी  करारामुळे भविष्यात पोषक पाणी मिळु शकणार, ज्याचा सर्वांगिण लाभ होणार असल्याचे श्री पाठक म्हणाले.

No comments:

Post a Comment