नवी दिल्ली : महाराष्ट्रामध्ये
अन्न प्रक्रिया उद्योगात विविध संधी आहेत. यासाठी शासनाकडुन सुविधा प्रदान करण्यात
येतात. याचा लाभ घेतल्यास या क्षेत्रात अधिक उंची गाठता येऊ शकते. असे, राज्याचे
कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर हे आज वर्ल्ड फुड इंडिया-2017 च्या ‘महाराष्ट्र दालना’ च्या
उदघाटना प्रसंगी म्हणाले.
अन्न
प्रक्रिया उद्योगात प्रचंड क्षमता असून नवनवीन संधी शोधली जात आहे. राज्यातील अनेक
खाद्यपदार्थांशी संबंधित वस्तुंवर प्रक्रियाकरून निर्यात करण्यात येते. हे क्षेत्र
अग्रेसर होत असून याचे प्रतिबिंब महाराष्ट्र दालनात उतरविण्याचा प्रयत्न करण्यात
आले आहे, असे श्री फुंडकर यांनी सांगितले.
वर्ल्ड फुड इंडिया 2017
चे आयोजन केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने इंडिया गेट येथे
करण्यात आले. याठीकाणी महाराष्ट्र दालन उभारण्यात आलेले आहे. या दालनाचे उदघाटन
राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांच्याहस्ते झाले. यावेळी पशुसंवर्धन, दुग्धविकास व
मत्स्यविकास मंत्री
महादेव जानकर, कृषी, फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री सदाशिव खोत, कृषी विभागाचे
सचिव विजय कुमार, कृषी आयुक्त डॉ. सचेंद्र प्रताप सिंग, नानासाहेब देशमूख कृषी संजीवनी
प्रकल्पाचे प्रकल्प संचालक विकास रस्तोगी, सचिव तथा निवासी आयुक्त आभा शुक्ला, राजशिष्टाचार
व गुंतवणुक आयुक्त लोकेश चंद्रा यासह कृषी, पणन, विभागाचे वरीष्ठ अधिकारी तसेच विविध
दालनाचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या दालनामध्ये शासनाचे तसेच खाजगी
अन्न प्रक्रिया उद्योजकांची एकूण 21 दालने उभारण्यात आलेली आहेत. खादय प्रक्रिया, जास्तकाळ
टिकविण्यासाठी वापरण्यात येणा-या उपाययोजना, नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून तयार
करण्यात आलेली फळे, रस, अन्य पदार्थांचे प्रदर्शन याठिकाणी मांडण्यात आलेले आहे. या
दालनाचे सकल्पनांचित्र तसेच आतील सजावट जे.जे स्कुल ऑफ ऑर्टच्या चमुने केलेली आहे.
केंद्रीय अन्न
प्रक्रिया मंत्रालयातर्फे इंडिया गेट येथे 3ते 5 नोंव्हेबर दरम्यान वर्ल्ड फुड
इंडिया 2017 प्रदर्शन आणि परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या प्रदर्शनात
जगभरातील अन्न प्रक्रिया उद्योग, गुंवतणुकदार, तज्ञ सहभागी झालेले आहेत. अन्न
प्रक्रिया उद्योगात गुंतवणुक व व्यापार वाढविण्याच्या उद्देशाने, वर्ल्ड फुड
इंडियाचे आयोजन करण्यात आले आहे.
No comments:
Post a Comment