नवी
दिल्ली 3 : भारतात उत्पादन व प्रक्रिया क्षेत्रात गुंतवणूसाठी
अर्मायादीत संधी आहेत. भारताच्या विविध प्रदेशात
वेगवेगळया अन्नधान्य, फळांचे उत्पादन होत असल्यामुळे उत्पादीत वस्तुंवर
प्रक्रिया करण्याच्या उद्योग क्षेत्रात प्रचंड वाव असल्याचे, प्रधानमंत्री नरेंद्र
मोदी यांनी ‘वर्ल्ड फुड इंडिया-2017’ च्या उदघाटन कार्यक्रमात प्रतिपादीत केले.
प्रधानमंत्री यांच्या हस्ते ‘वर्ल्ड फुड इंडिया-2017’ च्या
कार्यक्रमाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी, अरमेनिया राष्ट्राचे राष्ट्रपती,
तसेच लटविया या राष्ट्राचे प्रधानमंत्री, केंद्रीय अन्न व प्रक्रिया उद्योग मंत्री
हरसिमरत कौर यासह सहभागीदार देश, उद्योजक, गुतंवणुकदार उपस्थित होते.
या मुख्य कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री
पांडुरंग फुंडकर, पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव तसेच कृषी,
फलोत्पादन पणन मंत्री राज्यमंत्री सदाशिव खोत उपस्थित होते. तीन दिवसांच्या या प्रदर्शनात महाराष्ट्रासह
अन्य राज्य सहभागी झाले आहेत. याशिवाय विविध राष्ट्र तसेच जगभरातील 2000 प्रतिनिधी
सहभागी झाले आहेत. इंडिया गेट येथे आयोजित या प्रदर्शनात महाराष्ट्राचे दालन
उभारण्यात आलेले आहे.
खाद्य पदार्थ टिकवुण ठेवण्यासाठी त्यावर प्रक्रिया करणे
ही भारताची पुरातन पंरपरा आहे. याचा वापर भारतीयांच्या घरोघरी केला जातो.
प्रक्रिया उद्योगात देशाची नवी वाटचाल असून या क्षेत्रात प्रचंड संधी असल्याचे
प्रधानमंत्री म्हणाले.
केळी, आंबा, दूध, फळभाज्यांमध्ये भारत निर्यातदाराची भुमिका
बजावत आहे. इज ऑफ डुइंग बिजनेस अंतर्गत देशाने मागील तीन वर्षात उल्लेखनीय भरारी
घेतली असल्याचा उल्लेखही प्रधानमंत्रींनी केला.
देशाच्या उद्योग विकासाला अधिक प्रोत्साहन देण्यासाठी 100
%
टक्के थेट परकीय गुंतवणूकीची मुभा दिलेली आहे. या उद्योगामध्ये अन्न
प्रक्रियावरील उद्योगांचा समावेश आहे. यातंर्गत गुंतवणुक करणा-या गुंतवणूकदांरासाठी
एक खिडकीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. जेणे करून मोठया प्रमाणात गुंतवणूक
येण्यास मार्ग प्रशस्थ होईल. प्रक्रिया उद्योगांमध्ये आवश्यक असणा-या विविध सोयी-सुविधा
निर्माणह होण्यसाठी आवश्यक पायाभुत सुविधा पुरविल्या जातील. यातंर्गत प्राथमिक
प्रक्रिया, गुणवत्ता टिकवणु राहणे, शितगृहे, मालवाहतुक या महत्वाच्या बाबी आहेत,
यावर गुंतवणूकदारांनी विचार करावा, असे आवाहन श्री मोदी यांनी यावेळी केले.
केंद्र शासनाने अन्नदाता शेतक-यांचे उत्पन्न दुप्पट
करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत.
यासाठी प्रधानमंत्री कृषी संपदा योजना आखली आहे. अन्न प्रक्रिया उद्योगामुळेही
शेतक-यांच्या उत्पन्नात वाढीचे परिणाम दिसून येतील, असेही श्री मोदी म्हणाले.
दुग्ध व्यवसाय हा एक महत्वपुर्ण ग्रामीण उद्योग आहे. ग्रामीण
अर्थव्यवस्थेत दुग्धव्यवसाय मोठी भुमिका निभावते. शेतक-यांसाठी हा जोडधंदा असून दूधावर
प्रक्रिया करून तयार होणा-या उत्पादनावरही
लक्ष केंद्रीत करणे गरजेचे असल्याचे प्रधानमंत्री म्हणाले. यासह देशी गायी, मासे,
मध या प्रकारांमध्येही बरेच काही करता येऊ शकते. यामुळे लाखो लोकांना रोजगाराच्या
नवनवीन संधी उपलब्ध होऊ शकतात, असेही श्री मोदी म्हणाले.
या कार्यक्रमात ‘निवेश बंधु’ या गुंतवणुक संकेत स्थळाची सुरूवात प्रधानमंत्री यांच्याहस्ते करण्यात
आली. यामध्ये देशभरातील सर्वच राज्यांच्या अन्न प्रक्रियेविषयीची माहिती या संकेत
स्थळावरून मिळणार आहे. कोणकोणत्या जिल्हयात काय खास अन्न प्रक्रिया उद्योग आहेत
याची सविस्तर माहिती तसेच कुठे गुंतवणुक करण्यास वाव आहे याबाबतही माहिती या संकेत
स्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी अन्न प्रक्रिया उद्योंगावर टपाल
टिकीट काढण्यात आले. यासह कॉफीटेबल पुस्तीकेचेही प्रकाशन करण्यात आले.
महाराष्ट्राच्या
इज ऑफ डूइंग चे कौतुक
इज ऑफ डुइंग अंतर्गत महाराष्ट्राच्या उद्योग धोरणाचे राष्ट्रीय
मंचावरून कौतुक करण्यात आले. महाराष्ट्र राज्याच्या नवउद्योग धोरणामुळे विविध
राष्ट्रांनी राज्यात अन्न प्रक्रिया उद्योगात गुतंवणूक केली आहे. याबाबत आजच्या
मुख्य उदघाटन कार्यक्रमात राष्ट्रीय मंचावरून आंतरराष्ट्रीय प्रतिनिधींनी कौतुक
केले.
No comments:
Post a Comment