नवी दिल्ली,5 : निश्चित कालावधित अन्न प्रक्रिया उद्योगाचे ध्येय पूर्ण करावे, अशी सूचना
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी आज येथे केली.
विज्ञान भवनात केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाच्यावतीने
3ते 5 नोव्हेंबर दरम्यान ‘वर्ल्ड फुड इंडिया-2017’ च्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या आयोजनाच्या समारोपीय
कार्यक्रमात राष्ट्रपती बोलत होते. याप्रसंगी केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री हरसिमरत बादल कौर, केंद्रीय
राज्यमंत्री निंरजन ज्योती, केंद्रीय सचिव
जे.पी. मीना, भारतीय उद्योग संघाचे राष्ट्रपती नामनिर्देशीत सदस्य राकेश भारती मीत्तल
मंचावर उपस्थित होते. यासह केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान, राज्याचे
कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर, देश विदेशातील प्रतिनिधी, गुंतवणुकदार यावेळी
उपस्थित होते.
अन्न प्रक्रिया उद्योगाव्दारे राबविण्यात आलेल्या
वर्ल्ड फुड इंडियाला मिळालेला ऐतिहासीक प्रतिसादाचे राष्ट्रपती कोविंद यांनी कौतुक
केले. या आयोजनामुळे भारतीय शेतक-यांना नक्कीच फायदा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त
केली. या कार्यक्रमात एकूण 60 देशांनी भाग घेतला असून अनेक आंतरराष्ट्रीय दर्ज्यांच्या
कंपन्यांनीही सहभाग नोंदवील्याचे त्यांनी सांगितले.
‘वर्ल्ड फुड इंडिया’ ला भारतीय खाद्य संस्कृतीच्या कुंभ मेळयाची उपमा
राष्ट्रपतींनी दिली. भारतीय प्राचिन ग्रंथात आयुर्वेद आणि योगाबद्दल जसे सांगितले
आहे तसेच अन्न पदार्थांचाही उल्लेख आढळत असल्याचे श्री कोविंद म्हणाले. भारताच्या
वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीचे कौतुक करत प्रत्येक राज्यानिहायच नव्हे तर जिल्हा
आणि गावांनिहायही खाद्य संस्कृती बदलत असल्याचा उल्लेख श्री कोविंद यांनी केला. खाद्य
संस्कृती भारतीयांचे जीवनातील अविभाज्य भाग आहेच याचे रूपांतर आज व्यवसायिकपणे
होणे गरजेचे असल्याचेही ते म्हणाले. याक्षेत्रात
असिमीत रोजगाराच्या संधी आहेत, लघु ते
मोठया उद्योगांपर्यंत सर्वांनाच अनेक त-हेरेने या उद्योगात आपले अस्तीत्व निर्माण
करता येऊ शकते.
अन्न धान्य उत्पादनाच्या क्षेत्रात कमीतकमी हानी होईल,
याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे सांगून अन्न प्रक्रिया उद्योगाला मिळालेल्या
प्रोत्साहनामुळे हे शक्य होईल, अशी अपेक्षा श्री कोविंद यांनी यावेळी व्यक्त केली.
भारताच्या
अन्न प्रक्रिया उद्योगातील संधीची जगाने घेतील दखल : हरसिमरत बादल
कौर
भारतात अन्न प्रक्रिया उद्योगात परकीय गुंतवणुक करण्यास
प्रचंड वाव असल्याचे वर्ल्ड फुड इंडिया-2017 ने सिद्ध करूद दाखविले. या
कार्यक्रमात एकूण 8000 बिजनेस टू बिजनेस
बैठका झाल्या, 50 पेक्षा अधिक करार झाले, असल्याची माहिती केंद्रीय अन्न व
प्रक्रिया मंत्री हरसिमरत बादल कौर यांनी दिली.
अन्न व प्रक्रिया उद्योग शेतकरी आणि ग्राहकांमधला दूवा म्हणून महत्वपूर्ण
भूमिका निभावण्याच्या दिशेने सज्ज झाले
आहे. यासाठी ‘मेगा फुड पार्क’, शितगृहे, मालवाहतुकीच्या
सूविधा निर्माण करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासर्वांमुळे अन्न धान्याचा अपव्यय
मोठया प्रमाणात कमी होईल, असे श्रीमती बादल म्हणाल्या. या सर्व संधी एका छाता खाली उपलब्ध व्हाव्यात
यासाठीच या ‘वर्ल्ड फुड इंडिया’चे
आयोजन करण्यात आलेले आहे. अनेक देशांनी, महत्वाच्या आंतरराष्ट्रीय कंपन्यांनी यात
सहभाग नोंदवुन आमचा विश्वास वाढवल्याचेही त्या म्हणाल्या.
महाराष्ट्राने
जाहीर केलेल्या अन्न प्रक्रिया धोरणाचे कौतुक
या कार्यक्रमात केंद्रीय अन्न
व प्रकिया मंत्री हरसिमरत बादल कौर यांनी सादर केलेल्या एकूण अहवालात महाराष्ट्र
शासनाने या कार्यक्रमामध्ये अन्न व प्रक्रिया धोरण जाहीर केल्याचे कौतुक श्री कौर
यांनी केले. महाराष्ट्रासह तेलगांना राज्यानेही आपले अन्न व प्रक्रिया धोरण जाहीर
केले आहे.
‘खिचडी’ ला राष्ट्रीय खाद्याचा दर्जा
‘वर्ल्ड फुड इिंडया’ च्या यशस्वी आयोजनाने इतिहासात आपली जागा निश्चित
केली असून या आयोजनात ‘खिचडी’ या भारतीय खाद्य पदार्थाला राष्ट्रीय
खाद्याचा दर्जा प्राप्त झाला आहे.
हिमालयाच्या टोकापासून ते कन्याकुमारीपर्यंत प्रत्येका
कुटूंबात खिचडी हा पदार्थ बनविला जातो तसेच तो वेगवेगळया नावाने संबोधला जातो. खिचडी हा सर्वाधिक पोष्टीक, आरोग्यास हितकारक
असा पदार्थ आहे. विविध डांळीचे मिश्रण करून साध्या सोप्या पद्धतीने हा बनविण्यात
येतो. भारतीतील सर्व स्तरातील समाज घटकात खिचडीची चव घेतली जाते. ‘खिचडी’ला राष्ट्रीय खाद्य पदार्थाचा दर्जा मिळाल्याने,
भारताने आपली सुवर्ण मोहर आंतरराष्ट्रीय खाद्य संस्कृतीत नोंदविली असल्याचे स्पष्ट
झाले आहे.
No comments:
Post a Comment