Saturday, 4 November 2017

आंतरराष्ट्रीय उद्योजकांसोबत जोडण्यासाठी वर्ल्ड फुड इंडियामुळे मार्ग प्रशस्थ : श्री. फुंडकर


नवी दिल्ली,4 : आंतरराष्ट्रीय उद्योजकांसोबत  जोडण्यासाठी  वर्ल्ड फुड इंडियामुळे मार्ग प्रशस्थ झाल्याचे प्रतिपादन राज्याचे कृषी मंत्री पांडूरंग फुंडकर यांनी विज्ञान भवन येथे केले.
 महाराष्ट्रात अन्न प्रक्रिया उद्योगयाविषयांवरील परिसंवाद आयोजित करण्यात आला त्यावेळी, श्री फुंडकर बोलत होते. या परिसंवादात राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई, उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव सुनिल पोरवाल, कृषी व फालोत्पादन प्रधान सचिव बिजय कुमार, भारतीय उद्योग संघांचे उपाध्यक्ष, बी. थैयरंगराजन उपस्थित होते. उपस्थितांमध्ये दुग्धविकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर, महाराष्ट्र शासनाचे वरिष्ठ अधिकारी, प्रतिनिधिंमध्ये प्रस्थापित उद्योजक, आंतरराष्ट्रीय प्रतिनिधी शिष्टमंडळे, नवोदित उद्योजक, मोठा संख्येने उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य या  प्रदर्शनात भागीदार आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर अन्न व प्रक्रिया उद्योगांमध्ये महाराष्ट्राची ओळख निर्माण करण्यासाठी वर्ल्ड फुड इंडियाचे आयोजन नक्कीच उपयोगी असल्याचे श्री फुंडकर म्हणाले.  या प्रदर्शानाच्या आयोजनामुळे अन्न  प्रक्रिया उद्योगांना संधी मिळणार आहे.
थेट परकीय गुंतवणुकीमध्ये भारत सरकार ने 100 टक्के  गुंतवणूक करण्याची मूभा दिलेली आहे. यासह आंतरिक उत्पादीत मालावरही 100 टक्के सुट दिलेली आहे. या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय उद्योगास गती मिळण्यासाठी नियमांना सुलभ बनविण्याची गरज असून यासाठी महाराष्ट्र शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू असल्याचे   श्री फुंडकर म्हणाले.  

महाराष्ट्र उद्योगप्रिय राज्य असून देशांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय उद्योजक महाराष्ट्रात गुंतवणुकिस नेहमीच उत्सुक असतात. विविध फळ-भाज्या परदेशात निर्यात करण्यात महाराष्ट्र अग्रेसर राज्य आहे. महाराष्ट्र उद्योग विकास महामंडळाच्या सहाकार्याने अन्न प्रक्रियेशी संबंधित नव-नवीन उद्योग उभारीत असल्याचे श्री फुंडकर म्हणाले.  कृषी क्लस्टर, वेगवेगळया नियमांच्या पुर्ततेसाठी एकच परवाना उपलब्ध केला जात आहे.  महाराष्ट्राने याबाबत सविस्तर धोरण जाहीर केले आहे. गुंतवणुकदारांना थेट आवाहन करून राज्यात गुंतवणूक करण्याची विनंती केली. या गुंतवणुकीचा सर्वाधिक लाभ शेतक-यांना मिळेल व शेतक-यांचे उत्पन्न दुप्पटीने वाढेल. महाराष्ट्र शासन गुंतवणुकदारांसाठी सर्वोतोपरी सहाकार्य करण्यासाठी तत्पर असल्याचेही कृषी मंत्री यावेळी म्हणाले.

No comments:

Post a Comment