नवी
दिल्ली 14 : महाराष्ट्रातील चंद्रपुर, औरंगाबाद आणि नागपूर
येथील ऊर्जा प्रकल्पांना राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्काराने राष्ट्रपती रामनाथ
कोविंद यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाच्या ऊर्जा दक्षता
ब्युरोच्यावतीने ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’ चे औचित्त साधून
कार्यक्रमाचे आयोजन विज्ञान भवनात करण्यात आले. यावेळी ऊर्जा संवर्धन पुरस्काराचे
वितरण राष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी केंद्रीय ऊर्जा राज्य
मंत्री राकेश सिंग यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
उद्योग क्षेत्रातील श्रेणीमध्ये चंद्रपूर
जिल्ह्यातील जीएमआर वरोरा ऊर्जा केंद्र या औष्णिक ऊर्जा प्रकल्पास प्रथम
क्रंमाकाचा पुरस्कार प्राप्त झाला असून हा पुरस्कार राष्ट्रपती यांच्या हस्ते प्रदान
करण्यात आला. या औष्णिक ऊर्जा प्रकल्पाने मोठया प्रमाणात ऊर्जेची बचत केलेली आहे.
परिवहन क्षेत्रातील श्रेणीमध्ये औरंगाबाद जिल्ह्यातील
वाळुंज येथील एन्डूर्रन्स टेक्नॉलॉजी मर्यादीत या ऑटोमोबाईल कंपनीला प्रथम क्रंमाक
प्राप्त झाला. राष्ट्रीपती यांच्या हस्ते हा पुरस्कार युनिटच्या उपाध्यक्षाने स्वीकरला.
या युनिटने 127 लाख रूपयांच्या ऊर्जेची बचत केलेली आहे.
उद्योग क्षेत्रातील श्रेणीमध्ये व्दितीय पुरस्कार
नागपूर जिल्ह्यातील मौदा येथील सुपर औष्णिक ऊर्जा केंद्र प्रकल्पाला प्राप्त झाला.
हा पुरस्कार केंद्रीय ऊर्जा राज्य मंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.
पुरस्कार प्रकल्प समुहाचे महाव्यवस्थापक राजकुमार यांनी हा पुरस्कार स्वीकारला. या
युनिटने वर्षभरात 405 लाख रूपयांची ऊर्जेची बचत केली.
नियत
कालावधीत सर्वांना 24 तास वीज उपलब्ध व्हावी : राष्ट्रपती
नवी
दिल्ली 14: सर्वांना 24 तास वीज उपलब्ध करून देण्यासाठी भारत
सरकार वचनबद्ध असून नियत कालावधीमध्ये हे ध्येय पुर्ण करावे, अशी सूचना राष्ट्रपती
रामनाथ कोंविद यांनी आज ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिना’ निमित्त आयोजित कार्यक्रमात केली.
‘वीज’ गरीब लोकांसाठी आर्थिक सुरक्षा कवचाचे काम करते. गरीब, शेतकरी, मजदूर आणि
आदिवासी अथवा वंचिताच्या झोपडीमध्ये ऊर्जा प्रदान करण्याची शासनाची जबाबदारी आहे. ऊर्जा संवर्धन जीवनात बदलाचे माध्यम बनत चाललेले
आहे. या दिशेने आणखी पाऊले उचलणे गरजेचे असल्याचे श्री कोंविद म्हणाले.
मागील तीन वर्षांमध्ये भारत देश ‘पॉवर सरप्लस’ राष्ट्र झाले आहे. मात्र, यामध्येच
समाधान मानुन चालणार नाही, तर गरजा वाढत चाललेल्या आहेत, त्यानुसार विविध ऊर्जा
निर्मितीही करणे गरजेचे आहे. औद्योगिकरणासाठी वीज तितकीच महत्वपुर्ण आहे, जेवढे
शेतीसाठी पाणी यामध्ये कुठलाही समझोता करून चालणार नाही. त्यासाठी ऊर्जा संवर्धनासह
सतत ऊर्जा मिळावी, यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकताही राष्ट्रपतींनी व्यक्त केली.
सरकारव्दारे राबविण्यात येणा-या विविध उपायायोजनांव्दारे
ऊर्जा बचत केली जात आहे. यासह शासनाव्दारे योग्य किमतीत एलईडी बल्बचे वितरण केले
जात आहे, या प्रोत्साहामुळेही वीजेची बचत होत आहे, जे प्रशसंनीय कार्य असल्याचे, राष्ट्रपती
म्हणाले.
‘मेक-इन-इंडिया’ पासून ते ‘स्मार्ट सिटी’ पर्यंत ऊर्जा दक्षता विषय सर्वच
प्रमुख कार्यक्रमांशी जोडलेले आहे. भारतात वीजेचा एक तृतीयांश भाग हा वाणिज्यिक
आणि निवासी भवनांसाठी उपयोग होत असतो. त्यामुळे निवास निर्माण क्षेत्रात ऊर्जा
दक्षता खुप आवश्यक असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.
ऊर्जा संवर्धना या विषयावर आधारित आयोजित चित्रकला
स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना राष्ट्रपतींच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन यावेळी
गौरविण्यात आले.
No comments:
Post a Comment