नवी दिल्ली,28: महाराष्ट्र परिचय केंद्राचे महत्व दिवसेंदिवस वाढते असल्याचे मत परभणी चे खासदार संजय जाधव यांनी व्यक्त केले.
श्री जावध यांनी आज महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. यावेळी झालेल्या अनौपचारीक चेर्चे दरम्यान त्यांनी परिचय केंद्राविषयी आपल्या भावना व्यक्त केल्या.परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुस्तक देऊन त्यांचे स्वागत केले. माहिती अधिकारी अंजू निमसरकर कांबळे, दैनिक सामनाचे दिल्ली ब्युरो चिफ निलेश कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.
महाराष्ट्र राज्य स्थापनेनंतर महाराष्ट्राचा परिचय देश पातळीवर व्हावा यासाठी स्थापीत केलेले हे केंद्र यशवंतराव चव्हाण यांच्या दूरदृष्टीचा परिचय होता. महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन अख्ख्या देशाला व्हावे या हेतुने सुरू झालेले या केंद्राचे वर्तमान स्वरूप अधिकच व्यापक असल्याचे सांगुन परिचय केंद्रात आल्यावर आपण महाराष्ट्रातच आहोत असेच येथील वातावरण आहे, असे श्री जावध यांनी बोलुन दाखविले. श्री जाधव यांनी त्यांच्या मतदार संघात होत असलेल्या विकास कामांबाबत माहिती दिली.
यावेळी श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने दिल्लीत राबविण्यात येणारे विविध उपक्रम, प्रकाशीत करण्यात येणारे विविध प्रकाशने आणि प्रसार माध्यमांशी साधण्यात येणारा समन्वय आदींची माहिती श्री. जाधव यांना दिली. महाराष्ट्र परिचय केंद्राच्या कामाबद्दल श्री जाधव यांनी समाधान व्यक्त केले व शुभेच्छा दिल्या.
No comments:
Post a Comment