Wednesday 27 December 2017

अधिकृत माहितीचे स्त्रोत परिचय केंद्र : दयानंद कांबळे
















गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची परिचय केंद्राला भेट

नवी दिल्ली, 27 : अधिकृत माहितीचे स्त्रोत म्हणून महाराष्ट्र परिचय केंद्राकडे बघितले जात असल्याचे कार्यालयाचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा करतांना व्यक्त केले.
यवतमाळ जिल्ह्ययातील उमरखेड येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील पत्रकारीता अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांनी बुधवारी महाराष्ट्र परिचय केंद्राला भेट दिली. त्यावेळी उपसंचालक श्री कांबळे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. राजधानी दिल्लीत महाराष्ट्र शासनाच्या प्रतिमा निर्मितीचे कार्य महाराष्ट्र परिचय केंद्राकडून कसे केले जाते याविषियी श्री कांबळे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी महाविद्यालयाचे केंद्र प्रमुख बालाजी लाभशेटवारच्या यांच्यासह प्राध्यपक लक्ष्मीकांत नंदपवार, प्राध्यापक संतोष मुडे, प्राध्यापक सिद्धेश्वर जगताप उपस्थित होते.    
      यावेळी झालेल्या औनपचारिक चर्चेमध्ये महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाअंतर्गत दिल्लीत कार्यरत महाराष्ट्र परिचय केंद्राच्या वैविध्यपूर्ण कार्याची माहिती उपसंचालकांनी दिली.  यामध्ये दैंनदिन कामकाजात केंद्र शासनाशी, महाराष्ट्र सदनात कार्यरत खासदार कक्षाद्वारे महाराष्ट्रातील खासदारांशी तसेच महाराष्ट्राबाहेरील मराठी मंडळांशी साधण्यात येणारा समन्वयाबाबत सांगितले. यासह दिल्लीस्थित मराठी व अन्य प्रादेशिक, राष्ट्रीय प्रसारमाध्यमांशी साधण्यात येणारा संपर्क  परिचय केंद्राव्दारे करण्यात येणारा समन्वय, परिचय केंद्रातर्फे राबविण्यात येणारे विविध अभिनव उपक्रम आदींची माहिती  श्री.कांबळे यांनी  दिली.
         महाराष्ट्र परिचय केंद्राची एसएमएस सेवा, कार्यालयाचे  तीन भाषेतील अधिकृत ट्विटर हँडल, फेसबुक पेजेस, युटयुब चॅनेल, ब्लॉग, व्हॉटसॲप गृप आदींच्या माध्यमातून प्रभावीपणे करण्यात येणारा शासनाचा जनसंपर्क तसेच प्रसिध्दीविषयीही श्री. कांबळे यांनी यावेळी सांगितले. विविध सामाजिक माध्यमांसाठी वैविध्यपुर्ण लिखाणाबाबतही श्री कांबळे यांनी यावेळी मार्गदर्शन केले. यावेळी विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांची उत्तरेही त्यांनी दिली.  माहिती अधिकारी अंजू निमसरकर-कांबळे यांनी शासनाच्या प्रतिमेनिर्मितीसाठी कार्यालयाकडून राबविण्यात येणा-या  उपक्रमांबाबते सादरीकरण दिले.

No comments:

Post a Comment