Friday 29 December 2017

कोल्हापूर पासपोर्ट वितरणात देशात प्रथम


नवी दिल्ली दि 29 :  देशातील नागरिकांना सुलभ पासपोर्ट सेवा मिळावी या उद्देशाने सुरु झालेल्या नवीन पासपोर्ट सेवा केंद्रामध्ये पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील कोल्हापूर पहिल्या क्रमांकावर आहे.  विशेष म्हणजे देशात पहिल्या पाच मध्ये राज्यातील तीन शहर असून पिंपरी चिंचवड़ दुसऱ्या तर  औरंगाबाद पाचव्या स्थानावर आहे अशी माहिती विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांनी महाराष्ट्र परिचय केंद्राशी बोलताना दिली.
            देशात 251 केंद्र सुरू करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला असून यातील पहिल्या टप्यात सुरु करण्यात आलेल्या देशातील 59 केंद्रा पैकी पासपोर्ट वितरणात महाराष्ट्रातील तीन शहर पहिल्या पाच मध्ये आहेत .
कोल्हापुरातून 21 हजार 95 पासपोर्टचे वितरण
कोल्हापूर पासपोर्ट सेवा केंद्रातून 21 हजार 95 पासपोर्ट चे वितरण करण्यात आले. देशात सर्वाधिक पासपोर्ट वितरणाचा हा उच्चांक आहे. पिंपरी चिंचवड़ पासपोर्ट वितरण केंद्रातून 20 हजार 83 तर औरंगाबाद केंद्रातून 14 हजार 973 पासपोर्ट वितरित करण्यात आले . कर्नाटकातील म्हैसुरु तिसऱ्या क्रमांकावर असून या केंद्रातून 16 हजार 446 आणि चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या भुज (गुजरात) केंद्रातून 15 हजार 281 पासपोर्ट वितरित करण्यात आल्याची माहिती  श्री मुळे यांनी परिचय केंद्रास दिली आहे.
आम्हाला ट्विटर वर follow करा http://twitter.com/micnewdelhi


*********

No comments:

Post a Comment