Tuesday 2 January 2018

महाराष्ट्रात जन धन योजनेच्या 2 कोटी बँक खात्यात 4 हजार कोटीच्या ठेवी



नवी दिल्ली, 2 : प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत डिसेंबर 2017 अखेर  देशभरात 30 कोटी हून अधिक बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात 71 हजार कोटीहून अधिक ठेवी जमा झाल्या आहेत. यामध्ये महाराष्ट्राचा वाटा 4 हजार 32 कोटी रुपयांचा आहे. 

प्रत्येक कुटुंबात किमान एक बँक खाते असावे या उद्देशाने प्रधानमंत्री जन धन योजना 28 ऑगस्ट 2014 रोजी सुरू करण्यात आली. आर्थिक समावेशन हा या योजनेचा प्रमुख उद्देश आहे. 

                                 देशात 30 कोटी जन धन बँक खाती

       देशभरात प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत डिसेंबर 2017 अखेर 30 कोटी 79 लाख 51 हजार 262 बँक खाती उघडण्यात आली आहेत.यामध्ये ग्रामीण व निमशहरी भागातील बँक खात्यांची संख्या 18 कोटी 11 लाख 56 हजार 759 इतकी आहे तर शहरी व महानगरामधील बँक खात्यांची संख्या 12 कोटी 67 लाख 94 हजार 503 इतकी आहे. या सर्व बँक खात्यात एकूण 71 हजार 501 कोटी 17 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. या ठेवींमध्ये महाराष्ट्राचा वाटा 4 हजार 32 कोटी 99 लाख रुपयांचा आहे.

                              महाराष्ट्रात 2 कोटीहून अधिक जन धन बँक खाती

         ‘प्रधानमंत्री जन धन योजनेअंतर्गत डिसेंबर 2017 अखेर महाराष्ट्रात 2 कोटी 17 लाख 69 हजार 324 बँक खाती उघडण्यात आली आहेत, यामध्ये ग्रामीण व निमशहरी बँकांमध्ये 1 कोटी 47 लाख 1 हजार 657 बँक खाती तर शहरी व महानगरातील बँकांमध्ये 1 कोटी 29 लाख 7 हजार 667 बँक खाती उघडण्यात आली आहेत. या बँक खात्यात एकूण 4 हजार 32 कोटी 99 लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या आहेत. 

                            महाराष्ट्रात 1 कोटीहून अधिक रूपे कार्डचे वितरण

देशभरात 23 कोटी 22 लाख 60 हजार 470 रुपे कार्ड वितरित करण्यात आले आहेत. महाराष्ट्रात 1 कोटी 51 लाख 53 हजार 63 इतकी रूपे कार्ड वितरित करण्यात आली आहेत.

           महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा :

                                                     http://twitter.com/micnewdelhi

No comments:

Post a Comment