Wednesday, 24 January 2018

महाराष्ट्रातील 3 पोलीसांना ‘राष्ट्रपती पोलीस पदक’ महाराष्ट्राला एकूण 49 पदक






नवी दिल्ली 24 : राष्ट्रपती पोलीस पदकांची आज घोषणा झाली, महाराष्ट्रातील एकूण 49 पोलीसांना हा पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये 3 पोलीसांना राष्ट्रपती पोलीस पदक, जणांना पोलीस शौर्यपदक तर 39 जणांना पोलीस पदक जाहीर झाली आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाच्यावतीने प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दरवर्षी देशातील पोलीसांच्या शौर्यासाठी पोलीस पदक जाहीर केली जातात. यावर्षी यातंर्गत 107 पोलीसांना पोलीस शौर्य पदक(पीएमजी), 75 पोलीसांना उत्कृष्ट सेवा राष्ट्रपती पोलीस पदक (पीपीएमडीएस ) आणि 613 पोलिसांना पोलीस पदक (पीएमएमएस) जाहीर झाली आहेत. यामध्ये महाराष्ट्राच्या एकूण 49 पदकांचा समावेश आहे.

राष्ट्रपती पोलीस पदकांमध्ये प्रशिक्षण आणि विशेष विभाग, मुंबईचे अतिरीक्त महासंचालक श्री. एस जगन्नाथ, वागळे इस्टेट ठाणेचे सहायक पोलीस आयुक्त श्री. बाजीराव भोसले आणि नंदुरबार येथील पोलिस अधिक्षक कार्यालयाचे उपनिरीक्षक श्री. विनायक राजपूत यांचा समावेश आहे.
पोलिस शौर्य पदक  
            महाराष्ट्रातील पोलिसांना पोलीस शार्ये पदक जाहीर झाले आहेत, त्यांची नावे खालील प्रमाणे.
1)      श्री.एम राजकुमार, आपीएस, अतिरिक्त पोलिस अधिक्षक                        
2)     श्री.संदिप पुंजा मंडलिक, पोलिस उपनिरिक्षक
3)      श्री.रमेश ज्ञानोबा खांडवे, पोलिस उपनिरिक्षक
4)    श्री.नानगासू पंजामी उसेंडी, नाईक
5)     श्री.निलेश जोगा मडवी, पोलिस शिपाई
6)     श्री.रमेश नटकू अतराम, पोलिस शिपाई
7)    श्री.बबलू दादूराम पुनगाडा, पोलिस शिपाई

यासह महाराष्ट्रातील 39 पोलीसांना पोलीस पदक जाहीर झाले आहेत. त्यांची नावे पूढील प्रमाणे आहेत.

1.       श्री.ज्ञानेश्वर सदाशिव चव्हाण,पोलीस उपायुक्त,परिक्षेत्र -2,दक्षिण विभाग मुंबई.
2.      श्री.महेश उदाजी पाटील.पोलीस अधिक्षक,ठाणे ग्रामीण.
3.      श्री.रविद्र कुसाजी वाडेकर.सहाय्यक पोलीस आयुक्त.डोंबिवली विभाग,ठाणे शहर.
4.     श्री.शांताराम तुकाराम अवसरे.सहाय्यक पोलीस आयुक्त,गुन्हे शाखा,ठाणे शहर.
5.     श्री.विश्वेश्वर प्रभकर नांदेडकर,उपविभागीय पोलीस अधिकारी,नांदेड.
6.      श्री.जर्नाधन जगन्नाथ घाडगे,सहाय्यक समादेशक,राज्य राखीव पोलीस बल गट -3 जालना.
7.     श्री.संजीवकुमार विश्वासराव पाटील,उपविभागीय पोलीस अधिकारी,कोल्हापूर.
8.     श्री.नेहरू दशरथ बंडगर,पोलीस निरिक्षक,राज्य राखीवपोलीस दल(प्रशिक्षण),दौंड.
9.      श्री.बाळासाहेब रामचंद्र घाडगे,पोलीस निरीक्षक,उत्तर पोलीस नियंत्रन कक्ष,मुंबई शहर
10.   श्री.भीम वामन छापछडे,पोलीस निरीक्षक (बिनतारी संदेश),पोलीस संचालक (बिनतारी संदेश),पुणे.
11.   श्री.प्रकाश कचरू सहाणे,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,बुलढाणा.
12.  श्री.प्रकाश नागप्पा बिराजदार,पोलीस निरीक्षक,वसई-पालघर.
13.   श्री.संजय रामराव देशमुख,पोलीस निरीक्षक,स्थनिक गुन्हे शाखा,यवतमाळ.
14. श्री.शाम सखाराम शिंदे,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.
15.  श्री.पांडूरंग नारायण शिंदे,पोलीस निरीक्षक,कुलाबा,मुंबई शहर.
16.  श्री.सुधीर प्रभाकर असपत,पोलीस निरीक्षक,पोलीस मुख्यालय,पुणे.
17.  श्री.सायरस बोमन ईरानी,पोलीस निरीक्षक,मुंबई शहर.
18.  श्री.अविनाश लक्ष्मीनारायण आघाव,पोलीस निरीक्षक,औरंगाबाद.
19.   श्री.सुनिल दशरथ महाडीक,पोलीस निरीक्षक,नागपूर शहर.
20.  श्री.ज्ञानेश्वर रायभान वाघ,पोलीस निरीक्षक,विशेष शाखा,मुंबई शहर.
21.  श्री.सुनिल विष्णुपंत लोखंडे,मुख्य सर्तकता अधिकरी,नागपूर.
22. श्री.चंदन शंकरराव शिंदे,पोलीस उपनिरीक्षक,गुन्हे अन्वेषण विभाग,मुंबई शहर.
23.  श्री.लहु परशुराम कुवारे,पोलीस उपनिरीक्षक,आतंकवाद निरोधी पथक,मुंबई शहर.
24.श्री.अब्दुल गफुर गफार खान,पोलीस उपनिरीक्षक,राज्य राखीव पोलीस दल गट-14,औरंगाबाद.
25. श्री.शिवमुर्ती अप्पय्या हुक्केरी,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,ट्रॉम्बे पोलीस ठाणे,मुंबई शहर.
26. श्री.युवराज मोतीराम पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,विभागीय गुन्हे शाखा,जळगाव.
27. श्री.विक्रम निवृत्ती काळे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
28. श्री.जयसिंगराव खाशाबा संकपाल यादव,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
29.  श्री.दिलीप पुंडलिक पाटील,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,राज्य राख्रीव पोलीस बल गट-6,धूळे.
30.  श्री.माताप्रसाद रामपाल पांडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नागपूर शहर.
31.   श्री.सुरेश गुणाजी वारंग,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सिंधुदूर्ग.
32.  श्री.विलास दगडू जगताप,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सातारा.
33.  श्री.चतुर डागा चित्तेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,नंदुरबार.
34. श्री.प्रदिप काशिराम पाटीलसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,धुळे
35. श्री.सोमनाथ रामचंद्र पवारसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,पुणे शहर.
36.  श्री.राशीद उस्मान शेखसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सांगली.
37. श्री.दिलीप वासुदेव वाघमारेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,अमरावती शहर.
38. श्री.दिलीपकुमार बब्रुवान सवानेसहाय्यक पोलीस उपनिरीक्षक,सोलापूर ग्रामीण.
39.  श्री.नंदकिशोर काशिनाथ सावखेडकर,पोलीस शिपाई,पोलीस नियंत्रन कक्ष,नाशिक.



No comments:

Post a Comment