नवी दिल्ली 24 : सीमाशुल्क आणि अबकारी विभागामधील विशेष उल्लेखनीय सेवेसाठी आज राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्रांची घोषणा करण्यात आली. देशभरातील ४४ अधिका-यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये महाराष्ट्रातील ७ अधिका-यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय अर्थमंत्रालयाच्यावतीने आज सीमाशुल्क आणि अबकारी विभागामधील विशेष उल्लेखनीय सेवेसाठी राष्ट्रपती प्रशंसा प्रमाणपत्रांची घोषणा करण्यात आली.
प्रधान आयुक्त कार्यालयांच्या श्रेणीमध्ये मुंबई येथील ॲनालेटिक्स अँड रिक्स मॅनेजमेंट संचालनालयाच्या अतिरीक्त महासंचालक सिमा बीस्ट, संचालक/अतिरीक्त संचालक/ अतिरीक्त आयुक्त आणि सहायक आयुक्त या श्रेणीमध्ये मुंबई येथील रेव्हीन्यु इन्टालीजन्स कार्यालयाचे अतिरीक्त संचालक प्रशांत कुमार यांचा समावेश आहे.
अधिक्षक /वरिष्ठ इन्टलिजन्स ऑफीसर श्रेणी मध्ये मुंबई सीमाशुल्क विभाग १ चे अधिक्षक भारत गाडे, डायरेक्टर जनरल ऑफ रेव्हेन्यु इन्टालीजन्स सिनीयर इन्टालिजन्स अधिकारी मुबीन जुवळे, मुंबई सेंट्रल एक्साईज/टॅक्स अँड जीएसटी झोन कार्यालयाचे अधिक्षक अकिफ हुसैन राजा, डायरेक्टर जनरल ऑफ रेव्हेन्यु इन्टालीजन्स विभागीय कार्यालयाचे सिनीयर इन्टालिजन्स अधिकारी एम.आय.रामचंद्रन आणि डायरेक्टर जनरल गुड्स अँड सर्वीस टॅक्स इन्टालीजन्स विभागीय कार्यालय पुणे चे सिनीयर इन्टालिजन्स अधिकारी रिपु सुधान कुमार यांचा पुरस्कार यादीत समावेश आहे.
००००
No comments:
Post a Comment