Monday, 1 January 2018

खासदार विनय सहस्त्रबुध्दे स्वीकारणार सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्षपद



नवी दिल्ली, 1 : महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार डॉ. विनय सहस्त्रबुध्दे यांची नुकतीच केंद्र शासनाच्या प्रतिष्ठीत आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या (आयसीसीआर) अध्यक्षपदी निवड झाली असून  मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी ते  पदभार स्वीकारणार आहेत.

                 आंतरराष्ट्रीय पातळीवर सांस्कृतिक जगतात या परिषदेला मानाचे स्थान आहे. विविध देशांबरोबरील सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतुने कार्यरत या परिषदेवर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी डॉ. सहस्त्रबुध्दे यांची  दिनांक 28 डिसेंबर 2017 रोजी  अध्यपदी निवड केली होती . यापूर्वी  माजी राष्ट्रपती सर्वश्री डॉ. मौलाना अबुलकलाम, डॉ. शंकरदयाळ शर्मा, डॉ. के.आर. नारायणन व माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी या नामवंतानी या प्रतिष्ठीत संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते. वर्ष  2014 पासून या परिषदेचे अध्यक्षपद रिक्त होते.   

            डॉ. सहस्त्रबुध्दे हे मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2018 रोजी सकाळी 10.30 वाजता येथील आयपीइस्टेट परिसारातील आझाद भवानात स्थित आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या कार्यालयात पदभार स्वीकारणार आहेत.

                                                                            ******



No comments:

Post a Comment