नवी दिल्ली, 2 : भारतीय संस्कृती व समाजाच्या वैशिष्टयांची ओळख जगाला
करून देणार असून यासाठी कार्यक्रम आखला असल्याची माहिती खासदार डॉ विनय
सहस्त्रबुध्दे यांनी आज भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर
दिली.
नुकतेच डॉ. सहस्त्रबुध्दे यांची
केंद्र शासनाच्या प्रतिष्ठीत अशा भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या अध्यक्षपदी
निवड झाली, आज त्यांनी परिषदेच्या महासंचालक रिवा गांगुली दास आणि वरिष्ठ
अधिका-यांच्या उपस्थितीत पदभार स्वीकारला.
यावेळी डॉ. सहस्त्रबुध्दे म्हणाले,
भारतीय सांस्कृतिक संबंध परिषद 70 वर्ष जुनी व प्रतिष्ठीत संस्था
आहे. अनेक नामवंतानी या संस्थेचे अध्यक्षपद भुषविले आहे. हाच वारसा पुढे घेऊन
जाताना संगीत, नृत्य, योग या पलीकडे भारतीय संस्कृतीचे वैशिष्टय असलेल्या विविध
प्रथा ,परंपरा, येथील लोकशाही परंपरा, समाज जीवन हे विविध दालनांद्वारे जगापुढे
आणण्याची गरज आहे. कला, साहित्य आणि
वाड्मय या माध्यमातून भारतीय संस्कृतीची उत्तम जान जगात पोहचविण्याच्या दिशेने
कार्य करण्यात येईल त्यासाठी त्रिसुत्री कार्यक्रम आखला असल्याचे त्यांनी
सांगितले.
काय आहे त्रिसूत्री
कार्यक्रम
भारतीय सांस्कृतिक
परिषदेचे संस्थात्मक जीवन समृध्द करणे व येथे चांगली कार्यसंस्कृती निर्माण करणे. भारतीय
संस्कृतीची माहिती सक्षमपणे पोचविण्यासाठी जगातील 37 देशांमधे
असलेल्या परिषदेच्या शाखा गतीशील करणे. हा त्रिसुत्रीतील
पहिला कार्यक्रम असणार. विदेशातील कलाकार, शैक्षणीक क्षेत्रातील नामवंत, विचारवंत,
साहित्यिकांच्या कार्यातून भारतीय संस्कृतीचे संदर्भ मांडले जावे भारताचा परिचय
जगाला व्हावा यासाठी भारतीय
संस्कृतीसंबंधी माहिती प्रभावीपणे या घटकांपर्यंत पोचविणे हे या त्रिसुत्रीतील दुसरे
सूत्र आहे. भारतीय लोकजीवन, ग्रामीणांचे व आदिवासींचे जीवन येथील पारंपरिक
तंत्रज्ञान या माध्यमातून भारतीय संस्कृतीची व्यापक संकल्पना जगापुढे मांडणे हे
तिसरे सूत्र असल्याचे डॉ. सहस्त्रबुध्दे
यांनी सांगितले.
आंतरराष्ट्रीय
पातळीवर सांस्कृतिक जगतात या परिषदेला मानाचे स्थान आहे. विविध देशांबरोबरील
सांस्कृतिक संबंध अधिक दृढ करण्याच्या हेतुने कार्यरत या परिषदेवर राष्ट्रपती
रामनाथ कोविंद यांनी डॉ. सहस्त्रबुध्दे यांची
दिनांक 28 डिसेंबर 2017 रोजी अध्यपदी निवड केली होती . यापूर्वी माजी राष्ट्रपती सर्वश्री डॉ. मौलाना अबुलकलाम,
डॉ. शंकरदयाळ शर्मा, डॉ. के.आर. नारायणन व माजी प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी
महाराष्ट्राचे प्रथम मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण, माजी केंद्रीय मंत्री वसंत साठे
या नामवंतानी या प्रतिष्ठीत संस्थेचे अध्यक्षपद भूषविले होते.
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो
करा :
*****
ont-weight:normal'>सूचना : सोबत
छायाचित्र जोडली आहेत.
No comments:
Post a Comment