नवी दिल्ली 10 : भारताबाहेर रोजगाराकरिता जाणाऱ्या कामगारांना रोजगार मिळवून
देण्यासाठी परदेशात ओव्हरसीज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित करण्यास विदेश
मंत्रालयाने तत्वत: मंजुरी दिली असल्याची माहिती राज्याचे कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील
निलंगेकर यांनी आज दिली.
केंद्रीय
परराष्ट्र मंत्री यांची कौशल्य विकास मंत्री संभाजी पाटील-निलंगेकर यांनी आज भेट घेतली. या भेटीदरम्यान श्री. पाटील-निलंगेकर
यांनी राज्य शासनामार्फत परदेशात सुरु करण्यात येणाऱ्या ओव्हरसीज प्लेसमेंट
सेंटरचे सादरीकरण करुन प्रस्ताव दिला. केंद्रीय परराष्ट्र मंत्री श्रीमती स्वराज
यांनी या प्रस्तावाला तत्वत: मान्यता
दिली आहे. या प्रस्तावाबाबतच्या सर्व बाबी पडताळून त्वरित ओव्हरसीज प्लेसमेंट
सेंटर कार्यान्वित केले जाईल, अशी
माहिती कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी दिली.
महाराष्ट्र
शासनाच्या कौशल्य विकास विभागामार्फत ओव्हरसिज प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित
करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. परदेशात लवकरच प्लेसमेंट सेंटर कार्यान्वित
होईल व विदेशात रोजगार संधी मिळविण्यासाठी इच्छुक असणाऱ्या कामगार वर्गाला
यामार्फत सर्व सुविधा पुरविण्यात येणार असल्याचेही श्री. पाटील-निलंगेकर यांनी
सांगितले.
No comments:
Post a Comment