महाराष्ट्राच्या चित्ररथाचे दिमाखदार सादरीकरण
नवी
दिल्ली, 23 : इंडीया गेट समोरील राजपथावर आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित करण्यात
येणा-या पथ संचलनाची पूर्व तयारी म्हणून फुल ड्रेस रिहर्सल करण्यात आली. देशाची
शस्त्रसज्जता ,प्रगती आणि वैविद्यपूर्ण संस्कृतीचे दर्शनच या निमित्ताने दिसून
आले. महाराष्ट्राच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा दर्शविणा-या
चित्ररथाचे दमदार सादरीकरणही झाले.
यावर्षी ६९ व्या प्रजासत्ताक दिना
निमित्त १० आशियान देशांचे राष्ट्राध्यक्ष राजपथावरील पथसंचलनासाठी खास पाहुणे
असणार आहेत. त्यानिमित्त यावर्षीच्या पथसंचलनात आशियान देशाला प्राधान्य देण्यात
आल्याचे आजच्या रिहर्सल मध्ये दिसून आले. पथसंचलनाची सुरुवात १० आशियान देशांचे
झेंडे उंचावणा-या भारतीय सैनिकांच्या आकर्षक मार्चने झाली. केंद्रीय
मंत्रालयांच्यावतीने प्रदर्शीत करण्यात आलेल्या एकूण ९ पैकी २
चित्ररथ हे विदेश मंत्रालयाचे होते. या चित्ररथांमध्ये आशियान देशांसोबत भारताचे शिक्षण, व्यापार ,
धर्म आणि संस्कृतिक क्षेत्रातील संबंध दर्शविण्यात आले . तसेच, भारतीय
वायुसेनेच्या फ्लाईंग पास मध्ये हेलीकॉप्टर्स वर भारतीय तिरंग्यासोबत तीन
सेनादलांचे झेंडे आणि आशियान देशांचे झेंडेही फडकताना दिसले.
भारताची शस्त्रसज्जता दर्शविणारे सुपरसोनिक
क्रूज मिसाइल 'ब्रह्मोस', स्वदेशी निर्भय मिसाइल,आकाश मिसाइल , टी-90 भीष्म टैंक, स्वदेशी
रडार स्वाथी, अश्वनी रडार ही यावेळी प्रदर्शीत करण्यात आले. भारतीय सैन्याचे तीनही
दल, एनसीसी,एनएसएस आदींनी यावेळी पथसंचलन केले.
शिवराज्याभिषेक सोहळा चित्ररथाचे दिमाखदार
सादरीकरण
यावेळी राज्यांची संस्कृती दर्शविणारे १४ चित्ररथ प्रदर्शीत झाले. महाराष्ट्राच्यावतीने शिवराज्याभिषेक सोहळा दर्शविणा-या चित्ररथाचे यावेळी दमदास सादरीकरण झाले. उपस्थितांनी यास टाळया वाजवून दाद दिली. १४ राज्यांसह ९ केंद्रीय मंत्रालयाचे असे एकूण २३ चित्ररथांचे यावेळी सादरीकरण झाले.
दरवर्षी
राजपथावर 26 जानेवारी या प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती, प्रधानमंत्री आणि परदेशी पाहुण्यांच्या उपस्थितीत पथसंचलन पार पडते.
यासाठी देशाच्या विविध भागातून या पथसंचलनात भाग घेण्यासाठी आलेले प्रतिनिधी कसून
अभ्यास करतात. प्रजासत्ताक दिनी होणा-या मुख्य पथसंचलनाची रंगीत तालीम म्हणून दरवर्षी
एकदा फुल ड्रेस रिहर्सलचे आयोजन करण्यात येते.
00000
No comments:
Post a Comment