Tuesday, 23 January 2018

ज्ञानेश्वर मुळे यांना डॉ.अब्दुल कलाम पुरस्कार


                
नवी दिल्ली, 23 : विदेश मंत्रालयाचे सचिव ज्ञानेश्वर मुळे यांना प्रशासनातील नावीन्यपूर्ण उपक्रमासाठीचा डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम पुरस्कार केंद्रीय वस्त्रोद्योग राज्यमंत्री अजय टमटा यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

             डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम सेंटरच्या वतीने विज्ञान भवन येथे आयोजित वार्षीक परिषदेत प्रशासनातील नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी देशभरातील ८ अधिका-यांना सन्मानीत करण्यात आले. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम सेंटरचे संस्थापक तथा मुख्यकार्यकारी अधिकारी श्रीजनपाल सिंह यांच्यासह गणमान्य व्यक्ती यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्राचे सुपूत्र तथा विदेश सेवेतील वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी पासपोर्ट विभागात राबविलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमांची दखल घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

            श्री. मुळे यांनी देशात पासपोर्ट सेवेचा विस्तार करण्यासाठी व  या सेवेचे सरलीकरण आणि पारदर्शीता आणण्यासाठी राबविलेल्या नावीन्यपूर्ण उपक्रमांची नोंद या पुरस्कारासाठी घेण्यात आली आहे. सन्मानपत्र आणि चषक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   
                                                                     00000

No comments:

Post a Comment