नवी दिल्ली 25 : शासनाच्या
ई-गव्हर्नन्स धोरणाचा लाभ घेऊन स्वावलंबी झालेल्या पुणे येथील रईसा शेख यांनी आज महाराष्ट्र परिचय
केंद्राला भेट दिली.
महाराष्ट्र
परिचय केंद्राचे उपसंचालक दयानंद कांबळे यांनी पुष्पगुच्छ देऊन रईसा शेख यांचे
स्वागत केले. रईसा यांचे पती, परिचय केंद्राच्या जनसंपर्क अधिकारी अमरज्योत कौर
अरोरा यावेळी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाच्या ई-गव्हर्नन्स
योजनेच्या माध्यमातून पुणे येथील कोंढवा येथे रईसा यांनी कॉमन सर्वीस सेंटरच्या
माध्यमातून सुरु केलेले कार्य याविषयी त्यांनी यावेळी झालेल्या अनौपचारिक
चर्चेदरम्यान माहिती दिली. रईसा यांनी पुणे परिसरातील गावा-गावांमध्ये जाऊन
लोकांना संगणक साक्षर करण्यासाठी केलेले , केंद्र शासनाच्या ‘डीजीधन’ मेळाव्याअंतर्गत त्यांनी पुणे येथे लावलेला
स्टॉल व त्यास मिळालेला प्रतिसाद आदी अनुभव त्यांनी यावेळी सांगीतले. महाराष्ट्र
परिचय केंद्राच्या बहुआयामी कार्याविषयी श्री. कांबळे यांनी रईसा शेख यांना यावेळी
माहिती दिली.
००००००
'>
No comments:
Post a Comment