नवी दिल्ली 25 : शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील
उपक्रमांमध्ये उल्लेखनीय सेवेसाठी आज ‘प्रधानमंत्री श्रम
पुरस्कार 2016’ ची घोषणा करण्यात आली. देशभरातील 5o कामगारांना हा पुरस्कार जाहीर झाला असून यामध्ये पुणे येथील टाटा मोटर्स
कंपनीचे मनोज कुमार अंछोर यांचा समावेश आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर
केंद्रीय श्रम व रोजगार मंत्रालयाच्यावतीने या पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. आस्थापनेवर
500 कामगारांपेक्षा जास्त कामगार असणा-या देशातील शासकीय, निमशासकीय व खाजगी
क्षेत्रातील उपक्रमांतील कामगारांची निवड या पुरस्कारासाठी करण्यात आली.
पुणे येथील
पिंपरी भागातील टाटा मोटर्स लिमीटेड चे मनोज कुमार अंछोर यांना श्रमश्री पुरस्कार
जाहीर झाला आहे. ४० हजार रूपये, सनद असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
श्रमरत्न,
श्रमभूषण, श्रम वीर/वीरांगना आणि श्रमश्री/श्रमदेवी अशा चार श्रेणीत हे पुरस्कार देण्यात येतो. यावर्षी श्रमरत्न
पुरस्कारासाठी देशभरातून कुणाचीच निवड झालेली नाही. तर सेल, भेल आणि टाटा
स्टीलच्या एकूण 12 कामगारांना श्रमभूषण पुरस्कार जाहीर झाला.
याशिवाय 18 जणांना श्रमवीर/श्रमवीरांगणा
पुरस्कार तर 20 कामगारांना श्रमश्री/श्रमदेवी
पुरस्कार जाहीर झाला आहे.
००००००
No comments:
Post a Comment