नवी दिल्ली, ८ : भटक्या विमुक्त जमातीच्या राष्ट्रीय आयोगाने आज केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री रामदास आठवले यांना आपला अहवाल सादर केला.
येथील शास्त्रीभवनात आज भटक्या विमुक्त जमातीच्या राष्ट्रीय आयोगाचे अध्यक्ष दादा इदाते यांनी श्री. आठवले यांना आयोगाचा अहवाल सादर केला. आयोगाचे सदस्य श्रवण सिंह राठौड आणि सदस्यसचिव बि.के. प्रसाद यावेळी उपस्थित होते.
अहवाल स्वीकारल्यानंतर श्री. आठवले म्हणाले, ९ जानेवारी २०१५ रोजी स्थापन झालेल्या भटक्या विमुक्त राष्ट्रीय आयोगाने आज आपला अहवाल सादर केला. आयोगाने २० सूचना व ८२ उपसूचना केल्या आहेत. देशातील प्रत्येक राज्यात व केंद्रशासीत प्रदेशात जावून आयोगाच्या सदस्यांनी देशात ५७१ विमुक्त जमाती, १ हजार ६२ भटक्या तर २५ अर्धभटक्या जमाती असल्याची नोंद केली आहे. देशात कायमस्वरूपी स्वतंत्र भटका विमुक्त जमाती आयोगाची स्थापना करावी, महाराष्ट्राच्या धर्तीवर देशातील अन्य राज्यांमध्ये या जमातींसाठी संचालनालय व आर्थिक महामंडळ उभारावे आदी अहवालातील सूचनांचा अभ्यास करून केंद्र सरकार यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेणार असल्याचे श्री. आठवले यांनी यावेळी सांगितले.
सूचना – सोबत छायाचित्रे जोडली आहेत.
No comments:
Post a Comment