Monday, 12 February 2018

महाराष्ट्राची ‘पारसी गारा एम्ब्रॉयडरी’ हुनर हाट चे आकर्षण
















नवी दिल्ली, १२ : केंद्रीय अल्पसंख्याक मंत्रालयाच्यावतीने येथील बाबाखडकसिंह मार्ग भागात आयोजित हुनर हाट प्रदर्शनात पनवेल(मुंबई) येथील झिनोबिया डावर यांच्या पारसी गारा एम्ब्रॉयडरी साडया, साडी बॉर्डर्स, फ्रेम्स दिल्लीकरांचे विशेष आकर्षण ठरत आहे.

            बाबाखडकसिंह मार्ग भागात हुनर हाट प्रदर्शनास सुरुवात झाली असून केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते व केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांच्या उपस्थितीत या प्रदर्शनाचे उदघाटन झाले. विविध राज्यातील हस्तकला व खाद्यपदार्थांचे एकूण १०० स्टॉल्स याठिकाणी उभारण्यात आले आहेत. महाराष्ट्राच्यावतीने येथे स्टॉल क्रमांक सी-४३ हा पारसी गारा एम्ब्रॉयडरीचा स्टॉल उभारण्यात आला असून हा वैशिष्टयपूर्ण स्टॉल दिल्लीकर कला रसिकांचे आकर्षण ठरत आहे.

            पनवेल येथील हस्तकलाकार झिनोबिया डावर यांच्या पारसी एम्ब्रॉयडरी स्टॉलवर ठेवण्यात आलेल्या वैशिष्टयपूर्ण साडया, साडी बॉर्डर्स आणि फ्रेम्स हुनरहाटमध्ये येणा-या प्रत्येकाला आकर्षित करीत आहेत. गेल्या १८ वर्षांपासून गारा एम्ब्रॉयडरीची कला जोपासताना ही कला जास्तीत-जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी आपण या प्रदर्शनात सहभागी झाल्याचे झिनोबिया सांगतात. विशिष्ट मलबारी सिल्क कापडावर कॉर्बीडन शिवण घेऊन तयार करण्यात आलेल्या साडया येथे आहेत. येथे बजेट गारा आणि फुल गारा अशा  दोन प्रकारच्या साडया  विक्रीस आहेत. रूपये ३६ हजार ते ६० हजार किंमतीच्या बजेट गारा साडी व टॉप्स आणि १ लाख २० हजार रुपयांची फुल गारासाडीही याठिकाणी आहे. याशिवाय ३ इंच रुंद व ७ मिटर लांबीच्या व २० हजार रूपये किंमतीच्या सुरेख साडी बॉर्डर तसेच ९ ते ५४ हजार रूपये किंमतीच्या वैशिष्टपूर्ण फ्रेमही याठिकाणी आहेत.

            हुनर हाटमध्ये २२ राज्य व केंद्रशासीत प्रदेशामधील अल्पसंख्यांक समाजातील हस्तकलाकार सहभागी झाले असून याठिकाणी एकूण १०० स्टॉल्स उभारण्यात आली आहेत. दिनांक १८ फेब्रुवारी २०१८ पर्यंत सकाळी ११ ते रात्री ९ दरम्यान हुनरहाटला भेट देता येणार आहे. 
         
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा        :  http://twitter.com/micnewdelhi

                                                                     ००००००

No comments:

Post a Comment