Monday, 12 February 2018

महाराष्ट्रातील पानथळ क्षेत्र व खारफुटी जंगलात वाढ



नवी दिल्ली, १२ :  जलयुक्त शिवार योजना,पानथळ विकास कार्यक्रम आदींच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्रात वाढ झाली असून राज्यातील खारफुटी जंगलही ८२ चौ.किमी ने वाढल्याचे देशाच्या वार्षिक वन अहवालातून स्पष्ट झाले आहे. 

            आज केंद्रीय वने, पर्यावरण व हवामानबदल मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी वने विभागाचा वर्ष- २०१७ अहवाल सादर केला. या अहवालानुसार देशाच्या एकूण वनाच्छादित क्षेत्र ८ हजार २१ चौ.किमी. ची वाढ झाली असून जगात भारताचा १० वा क्रमांक लागतो. या अहवालानुसार जंगलातील पानथळ क्षेत्रात महाराष्ट्र पहिल्याक्रमांकावर आहे. राज्याच्या जंगलातील पानथळ क्षेत्र ४३२ चौ.किमी आहे तर ४२८ चौ.किमी. सह गुजरात दुस-या क्रमांकावर आहे यादित ३८९ चौ.किमी. सह मध्यप्रदेश तिस-या क्रमांकावर आहे.

खारफुटी जंगल क्षेत्रात वाढ
        देशातील खारफुटी जंगलात एकूण १८१ चौ. किमी एवढी वाढ झाली असून यात एकटया महाराष्ट्राचा वाटा ८२ चौ. किमी. एवढा आहे. राज्यातील ठाणे(३१), रायगड (२९), मुंबई उपनगर (१६), सिंधुदूर्ग(),रत्नागिरी() आणिमुंबई शहर() या जिल्हयांचा समावेश आहे. 

दृष्टीक्षेपात महाराष्ट्रातील वनक्षेत्र
            अहवालानुसार महाराष्ट्राचे एकूण भौगोलीक क्षेत्र ३ लाख ७ हजार७१३ चौ. किमी आहे. यापैकी ५० हजार ६८२ चौ.किमी. क्षेत्र  वनव्याप्त असून ते भौगालीक क्षेत्राच्या १६.४७ टक्के आहे. यात ८ हजार ७३६ चौ.किमी. हे अती घनदाट जंगल, २० हजार ६८२ मध्यम घनदाट जंगल,  २१ हजार २९४ चौ.किमी विरळ जंगल तर  ४ हजार१६० चौ. किमी  खुरटे जंगल आहे.                                       

                     राज्यातील डोंगराळ जिल्हयातील वनक्षेत्र
राज्यात एकूण ७ डोंगराळ जिल्हे असून त्यांचे एकूण भौगोलिक क्षेत्र ६९ हजार ९०५ एवढे आहे. यापैकी १५ हजार ६२० हे वनक्षेत्र असून ते २२.३४ टक्के आहे. एकूण वनक्षेत्रात अती घनदाट जंगल ३१५ , मध्यम घनदाट जंगल ७ हजार २४५, विरळ जंगल  ८ हजार ५९  आणि खुरटे जंगल १ हजार ४१५ चौ. किमी आहे.
                                    आदिवासी जिल्हयातील वनक्षेत्र
राज्यात एकूण १२ आदिवासी  जिल्हे असून त्यांचे भौगोलिक क्षेत्र १ लाख ४४ हजार २३३ आहे. यापैकी  ३० हजार ५३७ चौ. किमी वनक्षेत्र असून ते २१.३३ टक्के आहे. यात ७ हजार २२९ चौ.किमी. अती घनदाट जंगल, ११ हजार ६९५ चौ.किमी. मध्यम घनदाट जंगल,  ११ हजार ६१३ विरळ जंगल तर २ हजार १७७ खुरटे जंगल आहे.  
महाराष्ट्र परिचय केंद्राच्या अधिकृत व्टिटर हॅण्डलला फॉलो करा        :  http://twitter.com/micnewdelhi

                                                                     ००००००.

No comments:

Post a Comment